चीनमध्ये फिलीपिन्स आणि व्हिएतनाममध्ये अशिया सर्वात शक्तीशाली अशा यागी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यागी हे गेल्या दशकातील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचे हवामानशास्त्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर या चक्रीवादळाचे भीतीदायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. वादळाच्या तडाख्याने इमारती कोसळत आहे तर घराच्या खिडक्या उडत आहे. झाडे उन्मळून पडत असल्याचे दिसते आहे. नुकताच सोशल मीडियावर कियानटांग(China’s Qiantang ) नदीच्या खळखळत्या पाण्याजवळ सेल्फी घेताना असताना काही पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
चक्रीवादळामुळे कोसळला पूल
सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ यागीमुळे व्हिएतनाममध्ये शनिवारी संततधार पाऊस पडत असल्याने देशाच्या उत्तरेकडील भागात सोमवारी एक पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. लाम थाओ आणि ताम नॉन्ग जिल्ह्यांना जोडणारा फोंग चाऊ ब्रिज कोसळला आहे. धक्कादायक गोष्टमध्ये पुलासह एक ट्रकदेखील लाल नदीत (Red River) बुडाला. हा थरारकचा क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रक जवळजवळ पुलाच्या सुरुवातीला असल्याचे दिसते. ज्याक्षणी ट्रक पुलावर येतो त्याच क्षणी पुल कोसळतो. ट्रकसह पलू खाली वाहणाऱ्या नदीमध्ये कोसळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे दृश्य पाहून त्याच पुलावरून जाणाऱ्यासाठी मागून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने तातडीने ब्रेक मारून आपली दुचाकी सुरक्षित अंतरावार थांबवली.
बीबीसीने उपपंतप्रधान हो डक फोक यांचा हवाला देत म्हटले आहे की, फोंग चाऊ पूल कोसळल्याने तब्बल १० कार आणि दोन स्कूटर लाल नदीत पडल्या.
X वर व्हिडिओ शेअर करताना, अल जझीरा इंग्लिशने सांगितले की, “यागी वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसानंतर व्हिएतनाममध्ये पूल कोसळल्यानंतर ट्रक नदीत कोसळल्याचा क्षण व्हिडिओमध्य कैद झाले आहे.”
अनेक युजर्सनी कॉमेंट सेक्शनमध्ये व्हायरल व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “आजकाल सर्वत्र पूल पडत आहेत, असे दिसते की, कंत्राटदार मातीने पूल बांधत आहेत. ही मानवनिर्मित आपत्ती आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “बाईकचालक खरोखर भाग्यवान आहे यात काही शंका नाही की, देवाने त्याला वाचवले, ट्रकचालकाबरोबर अत्यंत वाईट झाले. मल आशा आहे की, तो त्याला जिवंत असेल.”
हेही वाचा – लेकीच्या डोळ्यांसमोर आईच्या अंगावर पडली रिक्षा, शाळकरी मुलीने दाखवलं धाडस! थरारक अपघाताचा Video Viral
“त्या दुर्दैवी ड्रायव्हरसाठी दुःखी आहे, आशा आहे की, तो ठीक आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.
VnExpress च्या म्हणण्यानुसार, “तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे आणि १३ लोक अजूनही बेपत्ता आहेत. “मृत आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या सध्या बेहिशेबी आहे, कारण कॅमेरा फुटेजमध्ये प्रत्येक वाहनात किती लोक होते हे स्पष्टपणे दिसत नाही,” VnExpressने लष्करी क्षेत्र २ चे राजकीय कमिसार, लेफ्टनंट जनरल फाम ड्यूक ड्यूएन यांनी सांगितले.
सुपर टायफून यागी, या वर्षातील आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ, उत्तर व्हिएतनाममध्ये किमान ४९ लोकांचा मृत्यू झाला आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला, रॉयटर्सने वृत्त दिले