Swara Bhaskar new Photo: बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखली जाते. उजव्या विचारसरणीच्या विरोधात स्वतःची मते मांडणाऱ्या स्वरा भास्करला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अगदी तिच्या धर्माबाहेर लग्न करण्याच्या निर्णयावरही अनेकांनी टीका केली होती. सध्या ती पुन्हा चर्चेत आहे. स्वरा भास्करचा पती फहाद अहमद हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यानिमित्त त्याने नुकतीच मौलाना सज्जाद नोमानी यांची स्वरा भास्करसह भेट घेतली. या भेटीचे फोटो फहाद अहमदने आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले. त्यानंतर हे फोटो बरेच व्हायरल झाले असून स्वरा भास्करला ट्रोल करण्यात येत आहे.

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी हे त्यांच्या व्होट जिहाद या विधानामुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या युट्यूबवरील एका व्हिडीओत त्यांनी व्होट जिहाद या शब्दाला उल्लेख केला होता. त्यानंतर भाजपाने हा व्हिडीओ व्हायरल करून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. कारण यामध्ये नोमानी यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची स्तुती केली आहे. हे तेच नोमानी आहेत, ज्यांनी यापूर्वी महिलांच्या शिक्षणाबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता स्वरा भास्करने त्यांच्यासह फोटो काढल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे वाचा >> Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?

फहाद अहमदने शेअर केलेल्या फोटोंसह कॅप्शन लिहिली आहे. यात तो लिहितो, “जनाब हजरत मोलाना सज्जाद नोमानी साहेब यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला आशीर्वाद देत आमचे कौतुक केले.”

स्वरा भास्करच्या बदललेल्या रुपावर अश्लाघ्य टीका

स्वरा भास्करने सज्जाद नोमानी यांची भेट घेताना मुस्लीम धर्मीय पेहराव केला असल्याची टीका तिच्यावर करण्यात येत आहे. एक्स या सोशल मीडिया साईटवर स्वरा भास्करचे जुने फोटो आणि आताचा फोटोला बाजूला लावून त्यांची तुलना करण्यात येत आहे. स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वीच ट्रोलर्सना यावरून फटकारलं होतं. मी एका बाळाची आई झालेली आहे आणि बाळंतीण अशीच दिसते, अशा शब्दात स्वराने ट्रोलर्सना सुनावलं होतं.

स्वरा भास्कर महिलांच्या अधिकारांबाबत नेहमी बोलत असते. मात्र आता महिलांच्या शिक्षणाबद्दल जुनाट विचार बोलून दाखविणाऱ्या मौलाना यांच्याबरोबर फोटो कसा काढला? असा आक्षेप काही लोक घेत आहेत. व्होट जिहादचा नारा देणाऱ्या सज्जाद नोमानींचा पाठिंबा फक्त पतीला मते मिळवून देण्यासाठी घेतला आहे का? असाही आरोप काही नेटिझन्स करत आहेत.

Story img Loader