मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान, एका स्विगी डिलिव्हरी एजंटने ऑर्डर पोहचवण्यासाठी चक्क घोड्यावरून प्रवास केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. संततधार पावसामुळे मुंबईतील एका भागात पाणी साचले होते. अशावेळी ऑर्डर पोहचवण्यासाठी स्विगी डिलिव्हरी बॉय चक्क घोड्यावरून जाताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत होता. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, डिलिव्हरी करण्याची ही अनोखी पद्धत सर्वांसमोर आली.

दरम्यान, काल ५ जुलै रोजी स्विगीने ट्विट करत, इंटरनेट प्रसिद्धीसाठी घोडेस्वारी करणाऱ्या या अज्ञात डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला ओळखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. स्विगीने एका निवेदनात म्हटले आहे की, ते व्यक्ती ओळखण्यात अक्षम आहेत. त्यांनी म्हटलंय, “हा शूर तरुण स्टार कोण आहे?” स्विगीच्या या वक्तव्यावर ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

काम करावं तर असं! मुंबईच्या मुसळधार पावसातून ऑर्डर पोहचवण्यासाठी Swiggy डिलिव्हरी बॉयचा घोड्यावरून प्रवास

“तो तुफान चालवत आहे की बिजली? त्याच्या पाठीला बांधलेल्या बॅगेत काय आहे? पावसाळ्याच्या दिवसात मुंबईचा गजबजलेला रस्ता ओलांडण्याचा तो इतका निर्धार का करतो? जेव्हा तो ही ऑर्डर देण्यासाठी गेला तेव्हा त्याने आपला घोडा कुठे पार्क केला?” असे प्रश्नही स्विगीने या निवेदनात विचारले आहेत. तसेच, त्यांनी पुढे म्हटलंय की,”स्विगी-वाइड हॉर्स हंट” लाँच केले गेले आहे आणि जो कोणी या ‘अ‍ॅक्सिडेंटल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ बद्दल माहिती देऊ शकेल त्याला त्याच्या स्विगी मनीमध्ये ५००० रुपये मिळतील.

दरम्यान, स्विगीच्या या निवेदनावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, ‘तो रणझोर का राठौर, जय!’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘हा चांगला उपक्रम आहे. तो घोडेस्वार शोधण्यासाठी स्विगीला मदत करूया.’