पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. मात्र जेव्हा तो रौद्र रूप धारण करतो तेव्हा सर्वांचीच तारांबळ उडते. मुंबईमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील काही भागांमध्ये पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.

पावसाळ्यात वेगवेगळे गरमागरम पदार्थ खाण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. त्यातच आता स्विगी झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी अ‍ॅप्समुळे घरच्या घरी जेवण ऑर्डर करणे अधिक सोपे झाले आहे. तसेच, यामुळे घरी जेवण न बनवता आपल्या प्रियजनांसोबत आपल्याला वेळ घालवता येतो. मात्र अशा ऋतूमध्ये ऑर्डर पोहचवताना या फूड डिलिव्हरी एजंट्सना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान, एका स्विगी डिलिव्हरी एजंटने ऑर्डर पोहचवण्यासाठी चक्क घोड्यावरून प्रवास केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की संततधार पावसामुळे मुंबईतील एका भागात पाणी साचले आहे. अशावेळी ऑर्डर पोहचवण्यासाठी स्विगी डिलिव्हरी बॉय चक्क घोड्यावरून जाताना दिसत आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, डिलिव्हरी करण्याची ही अनोखी पद्धत सर्वांसमोर आली आहे.

ऐकावं ते नवलंच! ‘या’ महापौराने चक्क मगरीशी बांधली लग्नगाठ; जाणून घ्या, काय आहे प्रकरण

काही तासांतच या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. अनेक इंटरनेट युजर्सनी या डिलिव्हरी बॉयच्या समर्पणाबद्दल कौतुक केले. एका यूजरने गंमतीने लिहिले की, “आता याला मी ‘शाही डिलिव्हरी’ म्हणतो.” दुसरा म्हणाला, “मला आशा आहे की तो पिझ्झा डिलिव्हरी करत नसावा.”

Viral : Zomato ने ट्विटरवर विचारला ‘हा’ प्रश्न’; नेटकऱ्यांची भन्नाट उत्तरं पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संततधार पावसात काळबादेवी आणि सायन भागात इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून बाधित इमारतींमधून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.