couple ordered food for guests online via Swiggy : लग्न म्हटलं की, प्रत्येकाच्या घरात लगबग सुरू होते. आधी साखरपुडा, मेंदी, हळद आदी कार्यक्रम साजरे होतात. नंतर मग लग्नाचा दिवस येतो. या सगळ्या कार्यक्रमांदरम्यान हॉलची व्यवस्था, हॉलमध्ये पाहुण्यांची बसण्याची सोय, नाश्ता, जेवण आदी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी कुटुंबातील एका व्यक्तीवर वा वेगवेगळ्या व्यक्तींवर सोपवलेली असते. तर पाहुण्यांना नाश्ता किंवा जेवण वाढण्यासाठी हॉलमध्ये जेवण बनवणारी माणसं किंवा कॅटरर्स, वेटर्स असतात. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे. एका जोडप्यानं त्यांच्या साखरपुड्यात जेवणासाठी स्विगीची (Swiggy) मदत घेतली आहे.

पूर्वी भारतीय विवाह समारंभामध्ये, जेवण बनवायला येणाऱ्या माणसांचा या सण, उत्सवात मोठा वाटा असायचा. हे लग्नघरात एखादा गोड पदार्थ असो किंवा पुरी तळणे असो यासाठी मदत करायचे. कालांतराने लग्नांमध्ये या जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांची जागा हळूहळू कॅटरर्सनी घेतली. आज तर तुम्हाला भारत देश आणखीन डिजिटल होताना दिसेल. कारण- या जोडप्यानं त्यांच्या साखरपुड्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर दिली आहे. नक्की काय घडलं आहे ते व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…

Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
fda starts drive to check food in festivals days
उत्सवकाळात एफडीए सक्रिय; गणेशोत्सव, दसरा, दिवाळी व नाताळादरम्यान विशेष मोहीम
navi Mumbai potholes repairing works
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
potholes roads Mumbai, Mumbai,
मुंबईतील रस्त्यावर आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला
underground water pipeline leakages
भुमिगत जलवाहिन्यांची गळती शोधण्यासाठी यंत्र खरेदी, ठाणे महापालिकेचा निर्णय; यंत्रामुळे होणार कमीत कमी रस्ते खोदाई
Discovery, plant, Talegaon Dabhade, blooms,
पुणे : वणव्यानंतर पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतीचा तळेगाव दाभाडेनजीक शोध

हेही वाचा…Tea Seller: महाराष्ट्रातील चहाविक्रेत्याची चर्चा; पाच रुपयांचा चहा, फोनवरून द्या ऑर्डर; पाहा महादेव नाना माळींची गोष्ट

पोस्ट नक्की बघा…

जेवण केलं ऑनलाइन ऑर्डर :

@shhuushhh_ एक्स (ट्विटर) युजर दिल्लीत राहणाऱ्या एका जोडप्याचा साखरपुड्याला गेलेला असतो. या कार्यक्रमाला तो गेला खरा; पण तेथील जेवणाची सोय पाहून तो थक्कच झाला. कारण- येथे जेवणासाठी बुफे सिस्टीम किंवा कॅटरर्सची मदत घेण्याऐवजी स्विगीवरून जेवण ऑनलाइन ऑर्डर करण्यात आलं होतं. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, स्विगी डिलिव्हरी बॉय हॉलमध्ये टेबलावर पार्सल बॉक्सचे डबे ठेवताना दिसला आहे. हे पाहताच युजरनं या अनोख्या संकल्पनेचा फोटो काढून, तो सोशल मीडियावर शेअर केला.

सोशल मीडियावर ही पोस्ट @shhuushhh_ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्ट शेअर करताना ‘जोडप्याने साखरपुडा समारंभासाठी ऑनलाइन जेवण ऑर्डर केले? भाऊ मी हे पाहिलं आहे…’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. वाढदिवस, लग्न समारंभ असो किंवा आणखीन कोणता कार्यक्रम येथे उपस्थित अनेक जण विनाकारण जास्त अन्न घेऊन अन्नाची नासाडी करतात. यावर उपाय म्हणून की काय या जोडप्यानं हा जबरदस्त मार्ग शोधून काढला आहे. जेवढी माणसं येणार तेवढेच जेवणाचे डबे ऑनलाइन स्विगीवरून मागवले जाणार.