scorecardresearch

T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली…

ट्विटरवरील एका अकाऊंटद्वारे त्यांना सतत येणाऱ्या धमक्यांची माहिती दिली जात होती, याविषयी क्रिकेटरची पत्नी सामियाने एक पोस्ट शेअर केली आहे.

hasan ali wife
हसन अली आणि सामिया आरजू (फोटो: @Samiya Hassan Ali/ Insatgarm)

टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा क्रिकेटर हसन अलीला सतत ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, त्याला, त्याची पत्नी सामिया आरजू आणि मुलगी यांना धमक्या दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ट्विटरवरील एका अकाऊंटद्वारे त्यांना सतत धमक्यांची माहिती दिली जात होती, याविषयी क्रिकेटरची पत्नी सामियाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना हसन अलीच्या पत्नीने ट्विटरच्या फेक अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, हे ट्विटर हँडल फेक आहे, माझे ट्विटरवर अकाउंट नाही. या अकाऊंटवरील धमक्यांची सर्व माहिती खोटी आहे, त्याऐवजी आम्हाला खूप पाठिंबा मिळत आहे.

( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

सामियाची सोशल मीडिया पोस्ट

सामियाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “या फेक अकाऊंटवरून मला, हसन आणि माझ्या मुलीला पाकिस्तानच्या लोकांकडून धमक्या आल्याची माहिती मिळाली, जे पूर्णपणे चुकीचे आहे. पण आम्हाला खूप पाठिंबा मिळाला. कृपया अशा विधानांवर विश्वास ठेवू नका आणि माझ्या नावाने बनवलेल्या अशा खात्याला फॉलो करू नका. मी ट्विटरवर नाही त्यामुळे अशा खात्यांची त्वरित तक्रार करा.”

यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खान आणि कर्णधार बाबर आझम यांनीही हसन अलीला पाठिंबा दिला होता. ते म्हणाले की, आम्हाला तसे वाटत नाही. हसन अलीनेही अनेक वेळा पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.

( हे ही वाचा: T20 WC 2021: पाकिस्तानच्या पराभवानंतर छोट्या चाहत्याला अश्रू अनावर; शोएब अख्तरने केला व्हिडीओ शेअर )

भारतीय खेळाडूकडून सपोर्ट

त्याचवेळी भारताच्या दिग्गज फिरकीपटूंपैकी एक असलेल्या हरभजन सिंगनेही पाकिस्तानी गोलंदाजाला साथ दिली. तो म्हणाला होता, एखाद्याच्या कुटुंबावर आणि अशा प्रकारे खेळाडूवर टीका करणे चुकीचे आहे. केवळ हे झेल चुकल्यामुळे पाकिस्तानने सामना गमावला नाही तर आणखी चुका झाल्या आहेत.

( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आलं हसू )

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्याच्या १९ व्या षटकात हसन अलीने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सेट फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला. त्यानंतर वेडने सलग तीन षटकार मारत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 12:03 IST

संबंधित बातम्या