T20 WC, Ind Vs Pak: ‘आइलाइनर, पोट खराब झालंय, टीम हरली म्हणून त्यांना टार्गेट करू नका…’ ; PAK महिलेचा VIDEO VIRAL

एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाचकचा हाय-व्होल्टेज सामना रंगतोय. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र एका पाकिस्तानी महिलेच्या व्हिडीओने एकच खळबळ माजलीय. पहा नेमका काय आहे हा व्हिडीओ?

india-vs-pakistan-viral-vide-pakistani-mahila
(Photo: Twitter/ mahobili)

भारत आणि पाकिस्तान या बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असताना पाकिस्तानची दमदार सुरुवात पाहून टीम इंडियाच्या फॅन्सचं टेन्शन वाढलं होतं. पाकिस्तान संघाला विराट सेनेनं १५२ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तान टीम पूर्ण करणार का? यासाठी साऱ्यांचंच लक्ष या महामुकाबल्याकडे लागलं होतं. याचवेळी दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र एका पाक महिलेच्या व्हिडीओनं एकच खळबळ माजली होती. सध्या एका पाकिस्तानी महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाक सामना रंगत होता तर सोशल मीडियावर ही पाकिस्तानी महिला आणि इतर युजर्समध्ये शाब्दिक सामना रंगलेला पहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये ही पाकिस्तानी महिला भारत-पाकच्या सामन्यावर टोमणे मारताना दिसून येतेय. तसंच ती सध्या खूपच तणावाखाली असल्याचं देखील या व्हिडीओमध्ये सांगताना दिसून येतेय. काय आहे हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी महिला म्हणतेय, “भारत-पाकिस्तानची मॅच सुरूये…माझं पोट, आइलाइनर खराब झालंय…चेहऱ्यावर पुरळ आले आहेत आणि श्वासही घेता येत नाही…जर आम्ही सुखरूप राहिलो तर टीमचं अभिनंदन करू….”

या व्हिडीओमध्ये पुढे बोलताना ही पाकिस्तानी महिला म्हणते, “जर ते मॅचमध्ये हरले तर कृपया टार्गेट करू नका…ते सुद्धा खेळण्यासाठीच आले आहेत आणि आम्ही सुद्धा खेळण्यासाठीच आलो आहोत…जर जास्तच राग आला तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन चार शिव्या द्या…पण जास्त काही बोलू नका…” इतकंच नव्हे तर आणखी पुढच्या व्हिडीओमध्ये ही पाकिस्तानी महिला म्हणते, “जिंकले तरी KFC आणि हरले तरी KFC…अशाने काही होणार नाही…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील ही पाकिस्तानी महिला एक सुप्रसिद्ध अॅंकर आहे. तिने तिच्या mahobili या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओवर अनेक नेटिझन्स वेगवेगळे मजेदार कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. “आमचं सुद्धा आइलाइनर खराब झालंय आणि चेहऱ्यावर पुरळ आले आहेत”, अशा कमेंट्स करत या महिलेच्या व्हिडीओवर वेगवेगळे विनोद शेअर केले जात आहेत.

या व्हिडीओच्या शेवटी ही पाकिस्तानी महिला म्हणते, “आता माझ्या मनातला राष्टवाद संपलाय, ज्यावर अनेक लोक विनोद करताना दिसून येत आहेत.” भारत आणि पाकिस्तानच्या हाय-व्हाल्टेज सामन्यापूर्वीच सोशल मीडियावरचं वातावरणं थोडं गरम झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या झोमॅटो आणि पाकिस्तानच्या करीममध्ये ट्विटर वॉर सुरू होतं. या व्यतिरिक्त दोन्ही देशातील युजर्स सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेअर करत एकमेकांवर निशाणा साधत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 india vs pakistan viral video mahobili punjabi t20 world cup match twitter trolls prp

ताज्या बातम्या