T20 World Cup: भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मोमीन साकिबचा व्हिडीओ व्हायरल!

“भाई.. मारो मुझे मारो…” या व्हायरल व्हिडीओमधून प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानच्या मोमीन साकिबचा कालच्या पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर आणखीन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

viral video of pakistani meme boy
मोमीन साकिबचा व्हायरल व्हिडीओ (फोटो: Momin Shakib / Instagram)

दुबईत रविवारी झालेल्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ ग्रुप २ च्या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध १० विकेटने पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ज्या प्रकारचा निकाल अपेक्षित केला होता तसा हा नव्हता पण तरीही, काल रात्रीच्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पाकिस्तानमधील व्हायरल मिम बॉय मोमीन साकिब ज्याचा २०१९ मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच ” भाई.. मारो मुझे मारो…” हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मोमीन रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होता आणि तो आनंदित झाला हे नमूद करण्याची गरज नाही.

अनेक व्हिडीओ केले शेअर

पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर व्हायरल झालेला पाकिस्तान मिम बॉय मोमीन साकिबने इंस्टाग्रामवर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. तो उत्सवाच्या मूडमध्ये होता आणि पाकिस्तानचा विजय साजरा करण्यासाठी तो सतत व्हिडीओ शेअर करत होता. एका व्हिडीओमध्ये अक्षय कुमारलाही पाहिले जाऊ शकते, जो सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.

( हे ही वाचा: ‘Squid Game’ मध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या भूमिकेत दिसलेला ‘हा’ भारतीय अभिनेता आहे तरी कोण? )

रविवारी भारताविरुद्ध पाकिस्तानच्या विजयानंतर मोमीन साकिबने शेअर केलेले काही व्हिडीओ पहा:

( हे ही वाचा:ट्रेंडिंग माणिक मागे हिते गाण्यावर पारंपारिक बिहू नृत्य बघितला का? व्हिडीओ होतोय व्हायरल )

“मुझे कुछ समाज नाही आ रहा!! मैं खुशी से पागल हो जाओ गा (मला काहीही समजत नाही! मी या आनंदामुळे वेडा होईन) (असे), ”त्याने त्याच्या एका व्हिडीओला कॅप्शन दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup momin shakibs video goes viral after pakistans historic victory over india ttg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या