बाल्कनीत करत होते रोमान्स, पाय घसरला आणि…

काही कपल्सना वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स करायला आवडतो. रोमान्समध्ये काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. पण या नादात अनेकदा ते भयंकर परस्थितीत अडकतात.

taiwan-couple-romance-on-balcony-viral
(Photo: Twitter/ Raam Beart)

बर्‍याचदा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात अनेक कपल हे रोमान्सच्या नादात आपला जीव सुद्धा टांगणीला लावतात. अशीच एक घटना नुकतीच तैवानमध्ये घडलीय. एक जोडपं बाल्कनीवर उभं असताना रोमान्स करत होते आणि तितक्यात महिलेचा पाय घसरून ती बाल्कनीतून खाली पडली. न्यूड अवस्थेतच ही महिला बिल्डींगखाली पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. हा व्हिडीओ पाहून काही जणांनी विनोद करण्यास सुरूवात केली तर काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं.

ही घटना तैवानमधील एका शहरातील आहे. ‘डेली रेकॉर्ड’ वेबसाईटवरील एका अहवालानुसार, एक जोडपं बाल्कनीमध्ये होतं आणि तिथे ते रोमान्स करत होते. त्यानंतर महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, महिला गाडीवर पडली आहे आणि तेही विना कपड्यांचीच.

जेव्हा ही महिला कारच्या छतावर पडली, तेव्हा मोठा आवाज झाला. आवाज ऐकून लोक तिथे पाहायला आले, मग लोकांनी वरच्या बाल्कनीतही पाहिले आणि त्यांना समजले की ती महिला कशी पडली आहे. यात महिलेला फार गंभीर दुखापत झालेली नाही, पण तिला किरकोळ दुखापत झाली होती, ती या व्हिडीओमध्ये वेदनेने विव्हळताना स्पष्टपणे दिसत होती.

कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जेव्हा ती महिला कारवर पडली, त्यानंतर थोड्याच वेळात तिचा साथीदारही बाल्कनीतून खाली आला आणि तिच्याजवळ गेला. धक्कादायक म्हणजे ती महिला बाल्कनीमधून खाली पडल्यानंतर तिला कोणती गंभीर दुखापत तर झाली नाही ना, याची विचारपूस करण्याऐवजी तिला साथीदार तिला किस करू लागला. महिलेला किस केल्यानंतर तिच्या साथीदाराने तिला खाली उतरवलं आणि रूग्णालयात घेऊन गेला. ते दोघेही बाल्कनीमध्ये इंटिमेट झाले होते, असं सांगण्यात येतंय.

ही घटना ५ सप्टेंबर रोजी तैवानमधील एका शहरात घडली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की या घटनेदरम्यान तो त्याच रस्त्यावरून जात होता. जेव्हा कारच्या जवळून खूप मोठा आवाज आला, तेव्हा त्याने वळून पाहिले की एक महिला कारच्या छतावर पडली होती.

काही कपल्सना वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स करायला आवडतो. रोमान्समध्ये काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. मग यामध्ये रोमान्स करण्याची पद्धत असो किंवा ठिकाण, ते वेगळं असावं याकडे त्यांचा जोर असतो. असाच हटके रोमान्स करण्याच्या नादात हे कपल भलत्याच अडचणीत सापडलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taiwan couple romance on balcony woman falls on car in parking prp

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी