Cheng Chang Fan Indian Girl Viral Photo: इंटरनेटवर कोणता फोटो, व्हिडीओ किंवा एखादी व्यक्ती अचानक चर्चेचा विषय बनेल हे सांगता येत नाही. सध्या तैवानचा अभिनेता आणि मॉडेल चेंग चांग फॅन याच कारणामुळे चर्चेत आला आहे. भारत दौऱ्यात हॉटेलमध्ये झालेल्या एका छोट्या भेटीचा व्हिडीओ जवळपास वर्षभरानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामागचं कारण म्हणजे चेंगच्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये दिसणारी एक भारतीय तरुणी.
चेंगने या तरुणीसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. दोघे एकत्र फिरताना, एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, ही तरुणी नेमकी कोण आहे आणि तिचं चेंगसोबतचं नातं काय?
२०२५मधील ‘तो’ व्हिडीओ पुन्हा चर्चेत का आला?
२०२५मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या चेंग चांग फॅनचा एका हॉटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हॉटेलमध्ये प्रवेश करताना एका महिला कर्मचाऱ्याने भारतीय परंपरेनुसार त्यांचं औक्षण केलं आणि कपाळावर टिळा लावला. त्या वेळी हा एक साधा आणि सुंदर स्वागताचा क्षण असल्याचं दिसत होतं. मात्र सोशल मीडियावरील काही युजर्सनी चेंग आणि त्या तरुणीच्या हावभावांकडे लक्ष दिलं. दोघांमध्ये दिसणारी सहजता आणि ‘केमिस्ट्री’ पाहून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.
नव्या फोटोमुळे जुन्या व्हिडीओची पुन्हा आठवण
काही काळानंतर चेंगच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एका भारतीय तरुणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ दिसू लागले. एका क्लिपमध्ये तो या तरुणीला मिठी मारताना आणि आनंदाने फिरवताना दिसत होता. हा व्हिडीओ आता त्याच्या अकाउंटवर उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यावेळी लिहिलेल्या भावनिक कॅप्शनमुळे नेटकऱ्यांची उत्सुकता आणखी वाढली.
यानंतर अनेकांनी जुन्या हॉटेलमधील व्हिडीओशी या नव्या फोटो-व्हिडीओची तुलना सुरू केली. दोन्ही ठिकाणी दिसणारी तरुणी एकच आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला.
‘तीच हॉटेलमधली मुलगी आहे का?’
हीच सध्या या संपूर्ण चर्चेची सर्वात मोठी उत्सुकता आहे. काही सोशल मीडिया युजर्सचा अंदाज आहे की, चेंगसोबत दिसणारी तरुणी कदाचित २०२५मध्ये हॉटेलमध्ये त्याचं स्वागत करणारी महिला असू शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. चेंगने या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचं सांगितलेलं नाही. तसेच दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे केवळ अंदाज किंवा अफवा म्हणूनच पाहणं योग्य ठरेल.
भारतीय मुलींचं कौतुक करत चेंगने काय लिहिलं?
या चर्चेला आणखी हवा मिळाली ती चेंगच्या भारतीय मुलींबद्दलच्या भावनिक पोस्टमुळे. चेंगने भारतीय मुलींच्या आपुलकी, प्रामाणिकपणा आणि समोरच्या व्यक्तीला सहजपणे कम्फर्टेबल करण्याच्या स्वभावाचं कौतुक केलं. त्याच्या मते, भारतीय मुलींचं सौंदर्य केवळ दिसण्यात नाही, तर त्यांच्यासोबत असताना जाणवणाऱ्या भावनेतही आहे.
विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदा हॉटेलमध्ये प्रवेश केल्याच्या दिवसापासूनच त्याला हा अनुभव आल्याचं त्याने नमूद केलं. पोस्टच्या शेवटी त्याने ‘Thank you, India’ असं लिहित भारतीय ध्वज आणि हार्ट इमोजीही वापरले.
कोण आहे चेंग चांग फॅन?
चेंग चांग फॅन हा तैवानचा अभिनेता, मॉडेल आणि व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. त्याने लंडनमधील University of the Arts येथे शिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. मॉडेलिंगच्या क्षेत्रात त्याने Dior, Hugo Boss आणि Burberry यांसारख्या प्रसिद्ध फॅशन ब्रँड्ससोबत काम केलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्याला २०२० मधील ‘Craving You’ या ड्रामातील भूमिकेमुळे ओळख मिळाली. त्यानंतर २०२२ मध्ये त्याने संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवत ‘Ain’t Nothing’ हे सिंगल रिलीज केलं. शोबिझच्या क्षेत्रासोबतच तो सध्या फुलांच्या व्यवसायाशीही संबंधित असल्याचं सांगितलं जातं.
खरं नातं काय? उत्तर अजूनही गुलदस्त्यात
चेंग चांग फॅनच्या नव्या पोस्ट्समुळे नेटकऱ्यांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. मात्र फोटो आणि व्हिडीओवरून कोणाचं नातं ठरवणं योग्य नाही. चेंग किंवा संबंधित तरुणीकडून त्यांच्या नात्याबाबत अधिकृत माहिती समोर येईपर्यंत ‘दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत’ असा दावा करणं घाईचं ठरेल. सध्या मात्र २०२५ मधील हॉटेलमधील व्हिडीओ आणि नव्या पोस्ट्स यांच्यातील कथित कनेक्शन सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
