Retirement Day: एकाच आयुष्याची “सेकंड इंनिंग” म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही आयुष्याची फर्स्ट इंनिंग खेळल्याणानंतर सेकंड इंनिंग फार महत्वाची असते.सेकंड इंनिंगमध्ये रन किती काढावे हे जरी फिक्स असले तरी खेळावे फर्स्ट इंनिंग पासूनच लागते.आयुष्यभर सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्ती हा हक्काचा दिवस येतोच. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहेच. असाच एक व्हिडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेवानिवृतीच्या दिवशी एका बस ड्रायव्हारने ढसाढसा रडत बसला आपल्या मिठीत घेतलं. बस ड्रायव्हरचा हा इमोशन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

एका सरकारी बस चालकाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बस ड्रायव्हर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसतो आहे. बस थांबली आहे. तसा तो स्टेअरिंगला हात लावून स्टेरिंगसमोर हात जोडतो. त्यानंतर बसमधून खाली उतरतो आणि बसला मिठीच मारतो. बराच वेळ तो बसला तसाच मिठी मारून राहतो. अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि काही वेळात त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांधच फुटतो. तो अक्षरशः ढसाढसा रडू लागतो. तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातं आहे. मुथुपंडी असं या बसचालकाचं नाव. ज्यांचं वय ६० वर्षे आहेत. तामिळनाडू स्टेट कार्पोरेशनचे ते कर्मचारी. तिरुपरंगुनराममध्ये ते ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ काम केलं. आता त्यांच्या निवृत्तीची वेळ आली. त्यांचा कामाचा शेवटचा दिवस. त्यामुळे जी बस त्यांच्यासोबत सदैव होती, जिच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होत होता, तिचा निरोप घेण्याची वेळ येताच, त्यांना गहिवरून आलं. त्यामुळे जशी बस डेपोत आणली तसे बससमोर हात जोडले. बसचं चुंबन घेत बसला मिठीही मारली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही भावूक झाले आहेत. या व्हिडीओवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत, यावेळी एकानं या व्हिडीओखाली एक चारोळी लिहीली आहे, “आयुष्याच्या उत्तरार्धात हवी तेवढी करावी मस्ती, समाधान असू द्यावे चित्ती. आयुष्याची तेवत ठेवावी मोमबत्ती, परंतु स्वतःच्या मनमुराद जगण्यातून शेवटपर्यंत कधीही घेऊ नये निवृत्ती”.

Story img Loader