scorecardresearch

टॅक्सी चालकानं माकडाला CPR देऊन वाचवला जीव; VIRAL VIDEO पाहून व्हाल भावूक

सध्या माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

tamilnadu, tamilnadu driver saved monkeys life,
सध्या माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आपल्याला कधी काही दुखापत झाली की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. पण प्रत्येकवेळी आपण डॉक्टरकडे पोहोचू इतका वेळा आपल्याकडे नसतो. त्यावेळी आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण त्या या व्हिडीओत ती व्यक्ती एका माकडाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती माकडाचा जीव वाचवण्यासाठी CPR देत असल्याचं दिसते. हा व्हिडीओ शेअर करत एक नेटकरी म्हणाला, जर तुम्ही हे पाहिलं नसेल तर, तामिळनाडूतील एका टॅक्सी ड्रायव्हरने सीपीआरच्या मदतीने माकडाचा जीव वाचवला…हे खरचं अविश्वसनीय आहे.

आणखी वाचा : साडे सात वर्षांनी ‘या’ राशीचे लोक होणार साडेसाती पासून मुक्त

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

त्या व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती आपल्या हातांनी जोरजोरात माकडाच्या छातीवर दाब देत असल्याचे दिसते. तसंच त्याच्या तोंडाने आपला श्वास त्याला देत राहिला. किती तरी वेळ तो असाच करत होता. अखेर स्तब्ध पडलेल्या त्या माकडाने अचानक डोळे उघडले. तेव्हा त्या व्यक्तीने आनंद व्यक्त केला. त्याने भावुक होतं तसंच त्या माकडाला आपल्या छातीशी कवटाळून घेतलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tamilnadu driver saved monkey life by giving cpr video viral dcp

ताज्या बातम्या