Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका व्यक्तीने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोकळा रस्ता आहे आणि रस्त्यावर भरधाव वेगात वाहनं जात आहेत. यावेळी असाच एक टँकर भरधाव वेगात जात आहे आणि शेजारी एक स्कूटरवाला जात आहे. यावेळी अचानक सरळ जाणारा स्कूटीचालकाचा तोल जातो आणि तो थेट टँकरला धडकतो, ही धडक इतकी जोरात आहे की तो थेट चाकाखाली गेला असता मात्र शेवट पाहून तुम्हाही अवाक् व्हाल. या व्यक्तीचं नशीब इतकं बलवत्तर आहे की टँकरला धडकूनही या व्यक्तीला काहीही होत नाही. तो पुढच्याच क्षणी उठून उभा राहतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत एकानं म्हंटलंय, “ज्यांचा कुणाचा नशीबावर विश्वास नसेल तर हा व्हिडीओ बघितला पाहिजे.” तर अनेकांनी ही त्या व्यक्तीचीच चूक असल्याचं म्हंटलंय.

Story img Loader