Viral Video : सोशल मीडियावर तुम्ही विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ सिनेमातील तौबा तौबा हे गाणं अनेकदा ऐकले असेल. या गाण्यावर अनेक लोकांनी रिल्स, व्हिडीओ बनविले आहे. या गाण्यामुळे पंजाबी गायक गायक करण औजला सुद्धा प्रकाशझोतात आला होता. सध्या करण औजला एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याच्याबरोबर एक संतापजनक प्रकार घडलाय. लंडन येथे सुरू असलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्याच्याबरोबर असे काही घडले की त्याने थेट लाईव्ह शोच थांबवला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (‘Tauba Tauba’ singer Karan Aujla pauses London concert after fan hits him with shoe)

करण औजला बरोबर नेमकं काय घडलं?

करण औजला लंडनमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. अचानक त्यावेळी प्रेक्षकांमधून एक बूट करणच्या अंगावर फेकण्यात आला त्यानंतर करण संतापला आणि त्याने लाइव्ह शो थांबवला. त्याने रागाच्या भरात बूट फेकलेल्या व्यक्तीवर आव्हान केले आणि त्या व्यक्तीला स्टेजवर येण्यास सांगितले. पुढे करण म्हणाला, “मी इतके वाईट गात नव्हतो की मला कोणी बूट फेकून मारावे. जर कोणाला समस्या असेल तर त्याने स्टेजवर येऊन थेट माझ्याशी बोलावे. कारण मी काहीही चुकीचे करत नाही.”
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Pune Indapur Truck : पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार! हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने हॉटेलमध्ये घातला ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “मुंबई कष्टकऱ्यांची, प्रामाणिकपणे राबणाऱ्या हातांची”, आतापर्यंतचं सर्वांत भारी गणपती डेकोरेशन; मुंबईकरांनो Video एकदा पाहा

पत्रकार गगनदिप सिंगने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणीतरी लंडन येथील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये करण औजलावर बूट मारून फेकला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे स्क्रिप्टेड आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी हे केल्यासारखे वाटते.” तर एका युजरने लिहिलेय, “करणनी प्रकरण खूप व्यवस्थित हाताळले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोक खरंच मूर्ख असतात.”

करण औजला

करण औजला हा एक पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक आहे. त्याने आजवर अनेक हिट गाणी दिली असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अलीकडेच करणने तौबा तौबा हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यावर विक्की कौशलनी केलेल्या डान्सची सुद्धा बरीच चर्चा रंगली होती. लोकांनी सुद्धा या गाण्यावर रिल्स व व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले होते.