scorecardresearch

VIRAL VIDEO : उष्णतेच्या लाटेवर बिहारी टीचरने गायलेलं हे गाणं एकदा ऐकाच!

अभिनेता गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या ‘कुली नंबर-1’ या हिट चित्रपटातील ‘आ जाना, आ जाना…’ हे गाणं गाऊन शिक्षकाने उन्हापासून बचावासाठी उपाय ज्या स्टाईलने सांगितले आहेत, ते पाहून सारेच जण या शिक्षकाच्या प्रेमात पडू लागले आहेत.

Teacher-Viral-Video
(Photo: Twitter/ teachersofbihar)

सोशल मीडियाच्या जगात कधी कुठल्या गमती जमती होतील हे कुणीच सांगू शकत नाही. यातील काही व्हिडीओ असे आहेत जे पाहिल्यानंतर तुम्ही भावूक होता. तर काही व्हिडीओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उष्णता आहे. उन्हाचा पारा एवढा चढला आहे, की रखरखत्या उन्हात बाहेर फिरणे मुश्कील झाले आहे. कडक उन्हाची झळ अंगाला सोसवत नाही. त्यामुळे प्रत्येकजण बेजार झाला आहे. अशात एका बिहारी शिक्षकाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अगदी फिल्मी स्टाईलमध्ये उष्णतेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा ते सांगत आहेत. अभिनेता गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या ‘कुली नंबर-1’ या हिट चित्रपटातील ‘आ जाना, आ जाना…’ हे गाणं गाऊन शिक्षकाने उन्हापासून बचावासाठी उपाय ज्या स्टाईलने सांगितले आहेत, ते पाहून सारेच जण या शिक्षकाच्या प्रेमात पडू लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेच्या वर्गात शिक्षक गळ्यात दोन पाण्याच्या बाटल्या अडकवून उभे आहेत. शिक्षकाच्या मागे असलेल्या फलकावर मोठ्या अक्षरात ‘लू’ असे लिहिलं आहे. उष्ण वाऱ्याला ‘लू’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे शिक्षक अगदी फिल्मी अंदाजात वर्गातल्या विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेबाबत मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल

गाण्यांच्या माध्यमातून हे बिहारी शिक्षक मुलांना तीव्र उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठीच्या टिप्स देत आहे. त्याचे गाणे ‘जब दिल ना लगे दिलदार’ या बॉलिवूड गाण्याच्या चालीत त्यांनी हे टीप्स अगदी अप्रतिम बसवले आहेत. त्यांच्या गाण्याचे शब्द असे आहेत, ‘न जाना न जाना, जब धूप रहे खूब तेज, तो बाहर न जाना, खुद को रखना घर में सहेज की बाहर मत जाना.’ शिक्षकांचा हा फिल्मी अंदाज वर्गातल्या विद्यार्थ्यांना खूपच आवडला आहे. शिक्षकांचे मजेदार गाणं ऐकताच विद्यार्थ्यांनी टळ्यांचा कडकडाट सुरू केला.

आणखी वाचा : कधी कासवांना तुम्ही पकडापकडी खेळताना पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : एका लॅपटॉपमुळे १७ जणांची नोकरी गेली; पाकिस्तानमधील अजब प्रकार चर्चेत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधले शिक्षक हसनपूर, समस्तीपूर इथल्या मालदाह प्राथमिक कन्या शाळेत शिकवतात. दोन पाण्याच्या बाटल्या आणि हातात छत्री घेऊन उष्णतेच्या लाटेपासून मुलांना सावध करणाऱ्या या शिक्षकाचं नाव वैद्यनाथ राजक असं आहे.
हा व्हिडीओ @teachersofbihar या ट्विटर हँडलवरून ३० एप्रिल रोजी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘सध्या आपण ज्या संकटाचा सामना करत आहोत ते म्हणजे उष्माघात. यापासून लहान मुलांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. आमचे सरकारही यासाठी प्रयत्न करत आहे. शिक्षक वैद्यनाथ राजक यांचा उष्माघातापासून मुलांना वाचवण्याचा अभिनव प्रयोग. कन्या शाळा मालदा, हसनपूर, समस्तीपूर.” हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि २०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teacher aware students to how avoid heat wave in bollywood style video viral prp

ताज्या बातम्या