भर वर्गातच शिक्षिकेचा भन्नाट डान्स, विद्यार्थ्यांनाही नाचवलं ; शाळेतील Viral Video इंटरनेटवर गाजला | Loksatta

भर वर्गातच शिक्षिकेचा भन्नाट डान्स, विद्यार्थ्यांनाही नाचवलं ; शाळेतील Viral Video इंटरनेटवर गाजला

शाळेतील शिक्षिकेचा भर वर्गात केलेला भन्नाट डान्स इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

भर वर्गातच शिक्षिकेचा भन्नाट डान्स, विद्यार्थ्यांनाही नाचवलं ; शाळेतील Viral Video इंटरनेटवर गाजला
शाळेतील शिक्षिकेनं विद्यार्थ्यांसोबत भन्नाट डान्स केला. (image-social media)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेकांना भन्नाट कल्पना सुचतात. रस्त्यावरू येजा करताना डान्स करणे, प्राण्यांसोबत मस्ती करणे, वाहनांवर स्टंट मारणे असे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याचं व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येत आहे. आता या कलाकारांमध्ये शाळेतील काही शिक्षकांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे. कारण एका शाळेतील शिक्षिकेनं गोविंदाच्या युपीवाला ठुमका लगाओ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. शिक्षिका नाचण्यात इतकी दंग झाली की, शाळेतील वर्गात असलेल्या विर्द्यार्थ्यांनाही तिने डान्स करायला लावलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

हा व्हिडीओ अनु्ष्का चौधरी नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिक्षिकेनं शाळेतील वर्गात गोविंदाच्या ‘हिरो नंबर वन’ सिनेमातील ‘युपीवाला ठुमका’ लगाओ गाण्यावर जबरदस्त ठेका धरला. शिक्षिकेला डान्स करताना पाहून विद्यार्थ्यांनाही ठुमके लगावण्याचा मोह आवरला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडीओला ३.६ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

नक्की वाचा – चोरट्यांपासून सावधान! तुमची कार हॅक करून लांबूनच करतील स्टार्ट, कसं ते वाचा सविस्तर

इथे पाहा व्हिडीओ

तसेच व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहे. एका युजरने म्हटलं, “माझ्या बालपणीही अशीच शिक्षिका असती तर…”. तर दुसऱ्या एकाने टोमणा मारत म्हटलंय, मॅम तुम्हाला खूप खूप आशिर्वाद…तुम्ही ड्युटी व्यवस्थीत करत आहात”. अशाच प्रकारचा शिक्षिकेनं शाळेतील विद्यार्थ्यांसोबत डान्स केलेला एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी या शिक्षिकेला धारेवर धरले होते. बेशिस्तपणाचा कळस!, अशा शिक्षकांना निलंबित केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणीही नेटकऱ्यांनी केली होती. या व्हिडीओत मात्र नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:38 IST
Next Story
Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा