Site Icon

Ek Number Tujhi Kambar song Dance : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी एखादे गाणे व्हायरल होते तर कधी एखाद्या गाण्यावरील डान्स व्हायरल होतो. सध्या अशाच एका गाण्याची जोरदार चर्चा होत आहे ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड या मराठमोळ्या गायकाचे ‘एक नंबर, तुझी कंबर’ हे नवीन गाणं सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

संजू राठोडचे शेकी शेकी गाणे चर्चेत

सध्या सगळेच नेटकरी ‘शेकी’ या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी कलाकारांपासून सर्वसामान्यापर्यंत सर्वजण या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या गाण्यावर नाचणाऱ्या शाळकरी मुलींचा आणि शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे.

‘एक नंबर, तुझी कंबर गाण्यावर थिरकल्या शिक्षिका

व्हायरल व्हिडीओमध्ये एक डान्स शिक्षिका विद्यार्थ्यांना डान्स शिकवत आहे. शाळकरी मुली शिक्षिकेबरोबर गाण्यावर थिरकत आहे. शिक्षिका शेकी शेकी गाण्याची डान्स स्टेप करत आहे. विद्यार्थींनी देखील तिला पाहून डान्स करत आहे. सर्वजण एका तालावर नाचत आहे आणि डान्सचा आनंद घेत डान्स घेत आहे. शाळकरी विद्यार्थी मोठ्याने गाणे म्हणताना ऐकून येत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुक

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षिकेचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले,”भारी” दुसऱ्याने कमेंट केली की, “तुम्ही आणि तुमचे विद्यार्थींनी जबरदस्त डान्स केला” तिसरा म्हणाला, “हे उत्तम आहे, प्रत्येक शाळेत असे केले पाहिजे,”

शेकी शेकी गाणे कोणी गायले

Shaky’ हे गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्यात संजूच्या सोबतीला ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. बालकलाकार साईराज केंद्रे आणि वेदांती यांनी देखील या गाण्यावर अफालतून डान्स केला आहे.