Viral video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्थी डान्स करताना दिसत आहेत. शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..
एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग्ज हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटातील गाणं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे खूप व्हायरल होत असून सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी शाळेत या गाण्यावर शिक्षक विद्यार्थी थिरकले आहेत.
विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकही थिरकले
पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशातच शिक्षक गजानन जोशी सरांनी हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक देखील थिरकले. कोकणात गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या, अतिशय दुर्गम भागातील मांगेली फणसवाडीच्या शाळेत चिमुकल्यांना बाराखडी आणि उजळणी शिकवतानाच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या प्रयत्न याठकाणी सरांनी केलेला दिसत आहे. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेतल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी “स्वर्गात आकाशगंगा…गंगेला सोनेरी घाट” या गाण्यावर डान्स करत आहे. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sagar.p.joshi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, “एकच नंबर सर”
