Viral Photo: सोशल मीडियावर विविध व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना आपण पाहतो. यामध्ये अनेकदा शाळेमधील अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी शाळेतील शिक्षिका मुलांना कविता शिकवताना दिसतात तर कधी शाळेतील शिक्षण मुलांसोबत डान्स करताना दिसतात. तसेच अनेकदा शाळेतील विद्यार्थी शिक्षकांचा वाढदिवस साजरा करताना देखील दिसतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करुन राहतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये शाळेतील एका वर्गातील काही विद्यार्थी चक्क झोपलेले दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, या शाळेतील एका वर्गात सर्व विद्यार्थी चक्क ढाराढूर झोपलेले दिसत आहेत. पण यावेळी वर्गात फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांचे शिक्षकही झोपलेले दिसत आहेत. विद्यार्थी जमिनीवर अंथरुण टाकून झोपले असून त्यांचे शिक्षण टेबलावर डोकं ठेवून झोपलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने फोटोवर, “सर्वोत्तम शिक्षक”, असं लिहिलं आहे. तसेच अनेक युजर्स या फोटोवर कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर मांजरीचे हटके एक्स्प्रेशन; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “ही मुलींपेक्षाही सुंदर…”

पाहा फोटो:

या फोटो इन्स्टाग्रामवरील @sarcasmlover_best या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत सात लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मला वाटतंय ते शिक्षक झोपायचं कसं ते शिकवत आहेत.”, तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “टिचर ऑफ द इयर”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “असे शिक्षक आम्हालाही पाहिजेत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “क्लास रुम नाही स्लिपिंग रुम आहे”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “म्हणून अभ्यास पूर्ण होत नाही”