India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : टीम इंडिया क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर हार्दिक पांड्याला रोखठोक नेतृत्व करताना अनेक सामन्यांमध्ये पाहिलं असेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात या मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या भेदर माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाला सर्वबाद १८८ धावांवर मजल मारता आली. पण याचदरम्यान मैदानात कर्णधार हार्दिक पांड्याचा पारा चढल्याचं त्याच्या एका षटकादरम्यान पाहायला मिळालं.

हार्दिकच्या त्या षटकात मिचेल मार्शने केलं असं काही…

सहाव्या षटकात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने त्याचं रन अप थांबवला होता. कारण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला साईट स्क्रीनचा अडथळा निर्माण होत होता. क्रिकेटच्या मैदानात अशी समस्या निर्माण होणे नवीन गोष्ट नाहीय. साईट स्क्रीनचा अडथळा निर्माण होत असल्यानं ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्क्रीनचा इश्यू दाखवत गोलंदाजांना रनअप थांबवत होते.

Sunil Gavaskar and Kevin Pietersen criticizes Hardik
IPL 2024: मुंबईच्या पराभवानंतर सुनील गावसकर हार्दिकवर संतापले; म्हणाले, ‘मी खूप दिवसांनी इतकी वाईट…’
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
hardik Pandya
हार्दिक पांड्याची ‘ती’ चूक अन् मुंबईने सामना गमावला; माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या कर्णधाराला झापलं

नक्की वाचा – IND vs AUS 1st ODI: रविंद्र जडेजाने कंबर कसली, हवेत उडी मारून घेतला मार्नस लॅबुशेनचा झेल, Video पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

पण त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवरही असाच प्रकार घडला. त्यानंतर हार्दिक पांड्या त्याच्या षटकातील तिसरा चेंडू फेकत असताना मिचेल मार्शनेही स्क्रीनचा अडथळा होत असल्याचं कारण देत हार्दिकचा रनअप थांबवला. त्यानंतर हार्दिकने थेट पंचाकडे धाव घेत यांसदर्भात खातरजमा केली. अंपायरन नितीन मेनन यांच्यासोबत हार्दिक चर्चा करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हार्दिक मार्शवर भडकला कि प्रेक्षकांवर हे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत नाहीय. हार्दिकचा मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.