scorecardresearch

Premium

Suryakumar Yadav : कसोटी क्रिकेटमध्येही भारताचा ‘सूर्या’ लवकरच तळपणार, म्हणाला, “आ रहा है, आ रहा है…”

‘आ रहा है, आ रहा है’ वो टाईम भी आ रहा है, टेस्ट क्रिकेटच्या पदार्पणाबाबत सूर्यकुमार यादव म्हणाला…

Suryakumar Yadav
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टेस्ट क्रिकेटबाबत मोठं विधान केलं..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी ट्वेन्टी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा तळपला. आयसीसीच्या क्रमवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट (T-20) मध्ये अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारचा रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा झंझावात पाहायला मिळाला. सूर्यकुमारने न्यूझीलंड विरुद्ध वादळी खेळी करुन टी ट्वेन्टी मधील दुसरं शतक ठोकून संपूर्ण क्रिडाविश्वातून वाहवा मिळवली. ३६० डिग्री प्लेयर म्हणून नावाजलेल्या सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ५१ चेंडूत १११ धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे भारताने यजमान न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. सूर्यकुमारने टी ट्वेन्टी मधील ४१ सामन्यांमध्ये १३९५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी ४५ असून स्ट्राईक रेट १८० हून अधिक आहे.

आणखी वाचा – बर्फाच्या डोंगरात विश्वविक्रमाला गवसणी, 30000 km प्रवास अन् अंटार्कटिकात फूड डिलिव्हरी, भारताच्या तरुणीचा Video होतोय Viral

cricket world cup 2023
ICC Cricket World Cup 2023: क्रिकेटच्या महासोहळय़ाला आजपासून प्रारंभ!
Pat Cummins Reaction After Defeat
IND vs AUS : ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे…’; भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्स असं का म्हणाला? जाणून घ्या
india vs australia 1st odi at mohali match prediction z
India Vs Australia 1st ODI: अश्विन, सुंदरच्या कामगिरीकडे लक्ष! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना आज मोहालीत
Kuldeep reveals secret behind brilliant bowling against Sri Lanka Said K.L. Bhai gave me a suggestion and we implemented it
Kuldeep Yadav: कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या शानदार गोलंदाजीमागील उलगडले गुपित; म्हणाला, “के.एल. राहुलने मला…”
'आता ती वेळ लवकरच येणार आहे', असं सूर्यकुमार यादवने म्हटलं.
Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव फक्त टी ट्वेन्टी क्रिकेटमध्येच चमकला नाही, तर त्याने वन डे क्रिकेटमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने तेरा सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीनं ३४० धावा केल्या आहेत. त्यामुळे व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही सूर्यकुमारने त्याचा जलवा दाखवला आहे. पण आता प्रतीक्षा आहे ती, रेड बॉल क्रिकेटच्या पदार्पणाची…टेस्ट क्रिकेटच्या पदार्पणाबाबत सूर्यकुमारला विचारलं असता, ‘आता ती वेळ लवकरच येणार आहे’, असं त्याने म्हटलं.

आणखी वाचा : याला म्हणतात प्रेम! फुटपाथवरील जोडप्याचा Viral Video पाहून सारेच झाले भावूक

कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाबाबत सूर्यकुमार म्हणाला….

‘आ रहा है, आ रहा है’ वो टाईम भी आ रहा है, म्हणजेच जेव्हा आम्ही क्रिकेट सुरु करतो तेव्हा रेड बॉलनेच खेळतो. मुंबईच्या संघासाठीही मी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे रेड बॉल क्रिकेटच्या फॉर्मेटची मला चांगली कल्पना आहे.मला या फॉर्मेटमध्येही खेळायला खूप आवडतं. मला आशा आहे, कसोटी क्रिकेटमध्येही माझं पदार्पण लवकरच होईल. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा रेड बॉलचाच वापर केला जातो, असं सूर्यकुमार यादव न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Team india star palyer suryakumar yadav gives big statement about test cricket debut new zealand vs india nss

First published on: 21-11-2022 at 12:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×