Besharam Rang Dance VIral VIdeo : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांच्या बेशरम रंग गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दीपिकाचा असा बोल्ड अंदाज तु्म्ही याआधी कधी पाहिला नसेल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गाण्याचं वेड तरुणांना लागलेलं दिसतंय. कारण एका मराठी अभिनेत्रीने ‘बेशरम रंग’ गाण्यावर बेली डान्स करून बोल्डनेसच्या सीमाच ओलांडल्या आहेत. अभिनेत्री माधुरी पवार हिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेत्रीचा भन्नाट बेली डान्स पाहून नेटकरी झाले घायाळ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत माधुरी पवार ही अभिनेत्री बोल्ड अंदाजात बेशरम रंग गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दीपिकाने केलेला बोल्ड डान्सही या माधुरीच्या बेली डान्सपुढं फिका पडेल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. माधुरीचा बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांसह सिनेविश्वात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “माधुरीनेने केलेला बोल्ड डान्स जबरदस्त आहे. असा भन्नाट बेली डान्स पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझ्याकडेही असा आत्मविश्वास असायला पाहिजे. पण दुसऱ्या एखाद्या दिवशी असेल.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, खूप अप्रतिम डान्स केला. तुझा डान्स मला आवडला. मी डान्स पाहून इम्प्रेस झालो. तुझे डान्स करण्याची कला खूप चांगली आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
@divyas_choreography नावाच्या युजरनेही बेशरम रंग गाण्यावरचा तरुणींच्या बोल्ड डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला होता. या व्हिडीओलाही इंटरनेटवर नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या व्हिडीओला एक लाखांहून अधिक व्यूज मिळाले. तरुणींचा एक डान्स ग्रुप पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावर थिरकताना या व्हिडीओत पाहू शकता. ज्याप्रकारे दीपिकाने बेशरम रंग गाण्यावर डान्स केला आहे, तशाच प्रकारच्या स्टेप्स या तरुणींनी केला आहे. हा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिकियांचा वर्षाव या व्हिडीओवर केला . तरुणींच्या अप्रतिम डान्सपुढं दीपिका पादुकोणच्या स्टेप्स फिक्या पडतील, अशा प्रकराच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओलाही दिल्या.