scorecardresearch

Video: भर रस्त्यात तरुणीने उधळला ‘बेशरम रंग’, तरुणीचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी म्हणाले, “लोक काय म्हणतील…”

लोकांच्या गर्दीसमोरच भर रस्त्यात तरुणी बेशरम रंग गाण्यावर थिरकली, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Video: भर रस्त्यात तरुणीने उधळला ‘बेशरम रंग’, तरुणीचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी म्हणाले, “लोक काय म्हणतील…”
एका तरुणीने भर रस्त्यात भन्नाट डान्स केला, (image-Instagram)

Pathaan movie songs video: शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा पठाण चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यानं आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असल्याने प्रेक्षकांना पठाण सिनेमाचे वेध लागले आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाने बोल्ड अंदाजात केलेला डान्स पाहून संपूर्ण सिनेविश्वातील कलाकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या गाण्याचे रिक्रिएशन केलेले व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच ‘झुमे जो पठाण’ हे गाणंही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण बेशरम गाण्यानं एक वेगळाच माहोल केलेला दिसतोय. कारण सहेली रुद्रा नावाच्या तरुणीने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची वाहवा मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला असून आतापर्यंत ४० लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

तरुणीने भन्नाट डान्स सुरु केला अन् लोकांची एकच गर्दी झाली

पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावर सहेलीने रस्त्यावर जमलेल्या गर्दीसमोरच जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या दिलखेचक अदा पाहून नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. सहेलीचे रोमॅंटिक ठुमके पाहिल्यानंतर नेटकरीही वाहवा करत आहेत. सहेलीचा डान्स करण्याचा उत्साहाने अनेकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ४० लाख व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर १ लाख ३० हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. सहेलीच्या डान्सचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, “खूप चांगलं एन्जॉय केलं, लोकं काय म्हणतील ते विसरून जा.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, डान्स एक नशा आहे, ज्यांना येत नाही ते वाईटच बोलतील.”

नक्की वाचा – Viral Video: धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला हातरुमालाच्या खेळात फुटला घाम, या तरुणीनं केला दारुण पराभव

इथे पाहा व्हिडीओ

जपानच्या तरुणीनंही बेशरम रंग गाण्यावर केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ mayojapan नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओही इंटरनेटवर प्रचंड गाजला आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत जवळपास 108 K व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. जपानी तरुणीनं सुंदर डान्स करून प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला भाग पाडलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत या तरुणीनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, “बेशरम रंग गाण्यावर दीपिका पादुकोणसारखा बोल्ड डान्स करण्याचा प्रयत्न केला. पण मी तिच्यासारखा डान्स करु शकली नाही. मी प्रयत्न नक्की केला.” तसेच या गाण्याच्या गायिका खुद्द शिल्पा राव यांनाही या तरुणीचा डान्स आवडला. “तुझा डान्स पाहायला आवडलं” अशी प्रतिक्रिया राव यांनी दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 21:12 IST

संबंधित बातम्या