अनेक वेळा टीव्ही अँकरला लाइव्ह न्यूज दरम्यान विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागते. मात्र, त्यानंतरही ते त्या परिस्थितीला घाबरत नाही आणि काम सुरूच ठेवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका न्यूज अँकरला अतिशय विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. नक्की काय झालं ते जाणून घेऊयात.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला अँकर लाइव्ह न्यूज वाचताना दिसत आहे. यादरम्यान, तिच्यासोबत असे काही घडते, जे अँकरसाठी खूप विचित्र आहे. मात्र, त्यानंतरही महिला अँकर बातम्या वाचणे तसेच सुरु ठेवते आणि आपले काम चोखपणे पार पाडण्यात यशस्वी ठरते. हा व्हिडीओ युक्रेनच्या न्यूज अँकरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

( हे ही वाचा: माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… )

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की युक्रेनची न्यूज अँकर मार्सिहका पडालको लाइव्ह शो करत होती. तुम्ही बघू शकता की ती बातमी वाचत होती, याच दरम्यान तिचा दात अचानक तुटला. पण अचानक घडलेल्या या घडामोडीनेही अँकरचे लक्ष विचलित होत नाही आणि त्यांनी ही घटना आपल्या कामात अडथळा बनू दिली नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला अँकर बातमी वाचताना तिच्या हातातील तुटलेला दात काढून घेते आणि त्यानंतरही न थांबता आपली जबाबदारी पार पाडते. यादरम्यान ती बातमी वाचताना एक सेकंदही थांबत नाही.

( हे ही वाचा: संतापलेल्या नवरदेवाच्या भावाने विवाह सोहळ्यात वाहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

( हे ही वाचा: डीजेचा आवाज ऐकून नवरदेव झाला बेभान, वऱ्हाडी मंडळी बघतच बसले; बघा Viral Video )

स्वतःच केला व्हिडीओ पोस्ट

युक्रेनची न्यूज अँकर मारिच्का हिने स्वतः या घटनेचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, बातमी पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या लक्षात येईल की मला अजिबात अपेक्षा नव्हती. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, एक दशकापूर्वी त्यांच्या मुलीने चुकून दातांवर लोखंडी घड्याळ मारले होते. त्यामुळे त्याचा दात तुटला होता. त्यानंतर तिला दात काढावे लागले.