scorecardresearch

मंदिरासमोर नव्या वाहनांची पूजा करतात त्या ठिकाणी थेट हेलिकॉप्टर घेऊन आला उद्योगपती; Video होतोय Viral

हेलिकॉप्टरने १०० किमीचा प्रवास करणाऱ्या उद्यागपतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मंदिरासमोर नव्या वाहनांची पूजा करतात त्या ठिकाणी थेट हेलिकॉप्टर घेऊन आला उद्योगपती; Video होतोय Viral
वाहन पूजेसाठी व्यवसायिकाने चक्क हेलिकॉप्टरच मंदिरात आणला. (image-social media)

नवीन दुचाकी किंवा चारचाकी खरेदी केली की, घरात नवीन पाहुणा आल्याच्या पोस्ट अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. कोणतीही गाडी घेतल्यावर मंदिरात जाऊन तिची पूजा करण्याची परंपरा काही जण नेटाने जोपासतात. पण हैदराबादचे उद्योगपती बोईनपल्ली श्रीनिवास राव यांनी चक्क खरेदी केलेला हेलिकॉप्टरच वाहन पुजा करण्यासाठी मंदिरातजवळ लॅंड केला. प्रथिमा ग्रुपचे मालक राव यांच्या एअरबस ACH-135 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रवास करत थेट याद्राद्री येथील श्री लक्ष्मी नरसिम्हा स्वामी मंदिर गाठले. हैद्राबादवरून हेलिकॉप्टरने १०० किमीचा प्रवास करणाऱ्या राव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मंदीरात असलेल्या तीन पुजारींनी विविध विधी पूर्ण करत हेलिकॉप्टरची वाहन पुजा केली. जवळपास $5.7 million एवढी या हेलिकॉप्टरची किंमत आहे. हेलिकॉप्टरचे वाहन पुजेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वाहन पुजेच्या कार्यक्रमासाठी श्रीनिवास राव यांचे नातेवाईक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर रावही उपस्थित होते. प्रथिमा ग्रुपने इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, मॅन्यूफॅक्चरिंग, टेलिकॉम सेक्टर आणि वैदकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरु करुन नावलैकीक मिळवलं आहे.

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दिवसेंदिवस अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. मंदिरात वाहन पुजेसाठी चक्क हेलिकॉप्टर आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एरव्ही आपल्याला मंदिरात वाहन पुजेसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. पण राव यांनी चक्क हेलिकॉप्टरच आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा व्हिडीओ इंटरनेटर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत. आशिष नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 10:34 IST

संबंधित बातम्या