scorecardresearch

हृदयद्रावक! घरात वाढदिवसाची तयारी आणि दारात मृतदेह; कुटुंबीयांनी मृत मुलाच्या हातांनी कापला केक

वाढदिवसाची खरेदी करायला गेला तो परतलाच नाही, ज्या हातांनी केक भरवायचा त्याच हातांनी मुलाला दिला अग्नी

Telangana viral news
सचिन वाढदिवसाची खरेदी करायला गेला तो परतलाच नाही…(Photo : Social Media)

कोणाचा मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही, असं म्हटंल जातं. सध्या याचेच एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका मुलाचा त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना तेलंगणात घडली असून याबाबतची माहिती आजतकने दिली आहे. तेलंगणा येथील एक कुटुंब आपल्या १६ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत होते. मात्र, वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्यांच्या मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, हृदयविकाराच्या झटका आल्याने त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाबरोबर वाढदिवस साजरा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आसिफाबाद जिल्ह्यातील बाबापूर येथील गुणवंत राव आणि ललिता यांना तीन मुलं आहेत. शुक्रवारी त्यांचा तिसरा मुलगा सचिन (१६) याचा वाढदिवस होता. सचिनच्या वाढदिवसाच्या तयारीत कुटुंबीय व्यस्त होते. वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन आसिफाबाद येथे खरेदीसाठी गेला होता.

खरेदी करतानाच छातीत दुखू लागले –

हेही पाहा- मुलं आहेत की मुली? नेटकरी संभ्रमात; साडी नेसलेल्या मुलांच्या डान्सचा Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

खरेदी करताना सचिनच्या छातीत दुखू लागले. आपली तब्येत बिघडल्याचं त्याने आई-वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी मनचेरियल रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घरी सुरु होती वाढदिवसाची तयारी –

सचिनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कारण, ज्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती, त्याच्यावरच कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करावे लागले.

हेही वाचा- पैसे दुप्पट करतो सांगत ४७ जणांची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक, लोकांना चित्रपटाचा ट्रेलर दाखवायचे अन्…

रडत रडत कुटुंबीय म्हणाले, “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

सचिनच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी निर्णय घेतला की, अंतिम संस्कार करण्यापूर्वी त्याच्या मृतदेहाबरोबर वाढदिवस साजरा करायचा. तशी तयारी घरच्यांनी केली आणि आई-वडील व इतर नातेवाईकांनी त्याचा हात धरून केक कापला. या दरम्यान सर्वांनी पाणवलेल्या डोळ्यांनी सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-05-2023 at 19:28 IST

संबंधित बातम्या