एकाचा फायदा दुसऱ्याचा लाभ… FB, Whatsapp बंद असल्याने Telegram ला कोट्यावधींचा फायदा

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बराच वेळ बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहेत. परंतु बंदच्या काळात टेलिग्रामला मोठ्या फायदा झाला आहे.

Telegram benifited
(फोटो : Reuters)

सोमवारी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या ६ तासांपर्यंतच्या आउटेजमुळे कंपनी, त्याचे संस्थापक, शेअर होल्डडर आणि या सेवांवर अवलंबून असणाऱ्या अनेकांचं नुकसान झालं. पण तेव्हाच टेलिग्राम या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी तो खूप चांगला दिवस होता.

टेलीग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी पावेल दुरोव यांनी मंगळवारी सांगितले की त्याच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपने काल “युजर नोंदणी आणि रजिस्ट्रेशनमध्ये विक्रमी वाढ” नवीन ७ कोटी युजर्स जोडले गेले. “आमच्या टीमने ही अभूतपूर्व वाढ कशी हाताळली याचा मला अभिमान आहे कारण टेलीग्राम आमच्या बहुसंख्य युजर्ससाठी सातत्याने काम करत आये” दुरोवनी त्याच्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिले.

ते म्हणाले, अमेरिकेतील काही युजर्सनी नेहमीपेक्षा कमी गती अनुभवली असावी कारण या खंडांतील लाखो युजर्सनी एकाच वेळी टेलिग्रामसाठी साइन अप करण्यासाठी धाव घेतली.

व्हॉट्सअॅपच्या नवीन गोपनीयता धोरणामुळे जागतिक स्तरावर संताप निर्माण झाल्यावर टेलिग्रामने जगभरातील युजर्सचा ओघही पाहिला होता. सेंसर टॉवरच्या आकडेवारीनुसार, त्याची स्थापना मोठ्या प्रमाणात वाढून सुमारे १६१ दशलक्ष झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Telegram benefits from facebook and whatsapp shutdown 70 million new users added ttg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रिय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी