हिंदी असो किंवा मराठी जुनी गाणी आजही लोकप्रिय आहेत. जुन्या काळातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असेच एक जुने गाणे सध्या चर्चेत आले आहे. या गाण्यांवर चिमुकल्यांनी डान्स देखील केला आहे जो पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन चिमुकल्यांनी ऋषी कपूर अन् श्रीदेवीच्या “तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा” गाण्यावर सुंदर डान्स केला आहे जो नेटकऱ्यांनी प्रंचड आवडला आहे.
व्हायरल व्हिडिओ एका शाळेतील ससंमेलन असल्याचे दिसते जिथे बहुधा फॅशन शो केला जात आहे जो जुन्या चित्रपटांवर आधारित आहे. ज्यामध्ये मुलांनी जुन्या हिंदी चित्रपटातील कलाकारांची वेषभूषा परिधान करून त्यांच्या गाण्यावर डान्स केला आहे. या कार्यक्रमादरम्यान दोन चिमकल्यांनी चांदणी चित्रपटातील ऋषी कपूर अन् श्रीदेवी यांच्या पात्रासारखी वेशभूषा केली आहे. “तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा” गाण्यामध्ये जशी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे त्याचप्रमाणे चिमुकलीनेही सुंदर साडी परिधान केली आहे. तर ऋषी कपूरने ज्याप्रमाणे शर्ट आणि त्यावर स्वेटर घातला आहे तशीच वेशभुषा चिमुकल्याने केली आहे. गाणे लागताच दोघे चिमुकले एकमेकांचा हात पकडून स्टेजवर येतात. स्टेजच्या मधोमध येऊन ते दोघेही गाण्यावर एक स्टेप करतात. ते दोघेही हात बाजूला धरतात आणि फक्त गाण्याच्या तालावर ठेक्यात मागे पुढे करतात. त्यांनी एक स्टेप इतकी सुंदर केली आहे की पाहता क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. त्यानंतर दोघेही हाताने टाटा करत स्टेजवरून बाहेर पडतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर marathi_memer_2.0 नावाच्या खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले की, सुपर से उपर (थोडक्यात खूप सुंदर डान्स होता. )
दुसऱ्याने लिहिले की, “एका स्टेपमध्ये गाणे संपले”
तिसऱ्याने लिहिले की, “एक स्टेप केली पण चांगली केली”
चौथ्याने लिहिले की,”वा सुंदर”
पाचव्याने लिहिले की,”सुंदर, किती गोंडस आहेत ते”