साप चावल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचे मृत्यू होतात ग्रामीण किंवा जंगली भागात किंवा त्याच्या जवळ राहणार्‍या अनेकांना विषारी साप चावण्याचा जास्त धोका असतो. ग्रामीण भागासह शहरामध्ये अनेकदा साप आढळतात. पावसाळा सुरू झाल्यापासून हेल्मेटमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये, शूजमध्ये साप आढळल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून काळजाचा थरकाप उडत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाच्या टी-शर्टमध्ये साप शिरल्याचे दिसत आहे. साप पाहून आसपासचे सर्वच लोक घाबरतात. दरम्यान एक काका तरुणाच्या मदतीला धावून येतात.

व्हिडीओमध्ये काही लोक झाडाच्या सावलीत बसलेले दिसत आहे. कोणी दगडावर बसले आहे तर कोणी मातीत कोणी पालापाचोळ्यात बसलेले आहे. दरम्यान एक तरुणाला त्याच्या टी शर्टमध्ये काहीतरी वळवळत असल्याचे जाणवते तेव्हा तो शेजारच्याला काय आहे पाहण्यास सांगतो. शेजारी बसलेले एक काका त्याच्या शर्टाला हात लावून पाहतात काय आहे. जेव्हा त्यांना अंदाज येत नाही तेव्हा ते त्याचा टी शर्ट वर करून पाहतात तर त्यांना एक साप दिसतो. साप पाहताच काका घाबरतात आणि तेथून उठून पळून जाता. आसापासचे लोकही बाजूला होतात.पण तरुण घाबरत नाही किंवा पळून जात नाही तो टीशर्ट पकडून तसाच बसून राहतो. एक व्यक्ती मदत करण्यासाठी येतो पण तोही घाबरून मागे हटतो. त्यानंतर तिथेच बसलेले दुसरे काका पुढे येतात, तरुणाचा टी-शर्ट वर करतात अन् सापाची शेपटी पकडून खचकन ओढतात. पण साप बाहेर येत नाही तो तिथेच अडकलेला दिसतो. तरी काका हार मानत नाही. क्षणाचा विलंब न करता ते पुन्हा साप झटक्यात ओढतात अन् लांब फेकून देतात आणि तरुणाचा जीव वाचवतात. व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहत आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर Marathi_parivar96 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, काकांची जे केले त्यासाठी त्यांना सलाम!”

दुसऱ्याने कमेंट केली की,”काका कुणाला घाबरत नाही.”

Live Updates