Terrifying Video : माणसाने वेदना सोसाव्यात तरी किती, काही हद्द, असा सवाल तुम्ही व्हायरल होणारा अतिशय वेदनादायी व्हिडीओ पाहून उपस्थित कराल. कारण- तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टेम (उत्तरीय तपासणी) केले जाते. त्यानंतरच तो मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला जातो आणि मग त्यावर रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, एखादा मृतदेह बेवारस असेल, तर रुग्णालयामध्ये त्याचे काय हाल होत असतील याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर माणुसकीलाही लाजवेल असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, तो एकदा पाहा, ज्यात पोस्टमार्टेम हाऊसबाहेरून (उत्तरीय तपासणी कक्ष) ज्या पद्धतीने मृतदेह नेला जात आहे, ते पाहून तुमच्याही काळजाचे पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. झाशीमध्ये घडलेली ही घटना पाहून मृत्यूनंतरही माणसाच्या मरण यातना संपेनात, असे म्हणावे लागेल.

मृतदेहाच्या पायाभोवती कपडा बांधला अन्…

झाशीच्या मेडिकल कॉजेलमधील पोस्टमार्टेम हाऊसबाहेर दोन कर्मचारी मृतदेहाच्या पायाभोवती कपडा बांधून मृतदेह ओढत नेताना दिसतायत. या निर्दयी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, मृतदेहाच्या दोन्ही पायांना कपडाने बांधलेले आहे. यावेळी दोन व्यक्ती त्या कपडाला दोरीप्रमाणे पकडून मृतदेह रस्त्यावरून ओढत शवविच्छेदन गृहापर्यंत नेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा बेवारस मृतदेह सापडला होता. हा तोच मृतदेह; जो अतिशय निर्दयी, क्रूरपणे फरफटत रस्त्यावरून नेला जात आहे.

१२८ किलो सोनं, हिरे आणि कोट्यवधींची रोकड; तिरुपती बालाजी मंदिराच्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ video खरा की खोटा; वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी याच पोस्टमार्टेम हाऊसमधील अशाच एका क्रूर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक रुग्णवाहिका चालक निर्दयतेने मृतदेह खाली फेकत होता. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह खाली फेकणाऱ्या श्याम सुंदर शर्मावर गुन्हा दाखल केला होता. आज पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी झाशीच्या शवविच्छेदन गृहामध्ये मानवी मृतदेहांना अशी वागणूक का दिली जाते, असा सवाल उपस्थित केला आहे.

व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि लोकांनी याला माणुसकीचा मृत्यू, असे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये दोन लोक ज्या प्रकारे मृतदेहाला कपड्याने बांधून क्रूरपणे ओढत आहेत, ते पाहून तुमच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स या व्हिडीओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत, जो सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, हा संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ज्याने हा व्हिडीओ बनवला, तो मृतदेह ओढून नेणाऱ्याइतकाच दोषी आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, जर व्हिडीओ बनवणारा माणूस इतका चिंतेत होता, तर त्याने त्यांना थांबवले का नाही?

Story img Loader