बाप आणि लेकाचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकाला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरं जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत पालक आपल्या लेकाला सांभाळण्याची, त्याचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाहीत. लहान मोठ्या सगळ्या संकटात ते आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभे राहतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात वडिलांनी त्यांच्या चिमुकल्याला अगदी मरणाच्या दारातून परत आणलं.

सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण जरा जास्तच वाढत चाललंय. याचे व्हिडीओ आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वडिलांनी कशाप्रकारे अपघात होण्यापासून आपल्या मुलाला वाचवलं ते एकदा पाहाच.

Women Fall From A Plastic Bucket While Standing On It To Check The Quality Funny Video Viral
“देवा काय करावं या बायकांचं?” क्वालिटी चेक करायला १५० रुपयांच्या बादलीवर उभी राहिली अन् तोल गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

हेही वाचा… VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या या व्हिडीओमुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या वडिलांबरोबर असतो. लहान मुलाला बाईकवर बसवून वडील त्याच्याच शेजारी उभे असतात. इतक्यात वाऱ्याच्या वेगात एक गाडी येते आणि त्या बाईकला धडक देते. प्रसंगावधान बाळगून वडील त्या भरधाव वेगात येणाऱ्या गाडीला पाहतात आणि क्षणाचा विलंब न करता आपल्या लेकाला उचलतात. हा अपघात पाहून वडील काही क्षणांसाठी घाबरून जातात.

हा व्हायरल व्हिडीओ @officia_ap_sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बाप श्रीमंत किंवा गरीब असणं महत्त्वाचं नाही, तर वडील आयुष्यात असणं महत्त्वाचं आहे”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळलेलं नाही.

हेही वाचा… आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आपले आई-वडीलच आपले दैवत असतात”, तर दुसऱ्याने “गाडीचालकाला शिक्षा झाली पाहिजे, त्याने वडील आणि मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे”, अशी कमेंट केली. “वडील असल्यावर मुलावर कोणतंच संकट येऊ शकत नाही”, अशी कमेंट एकाने केली.

Story img Loader