एस.एस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचं कारणं म्हणजे, चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ९५ वा ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली, त्यामध्ये RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या गाण्याची आणि त्याच्या डान्सची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. शिवाय ‘नाटू नाटू’ गाण्याने केवळ भारतामधीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जगभरातील अनेक लोकांना ते गाणं समजू शकत नसलं तरीही ते केवळ गाण्याच्या म्युझिकवर थिरकताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाबतचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच एका पाकिस्तानातील एका कपलने नाटू नाटू गाण्यावर केलेला भन्नाट डान्स व्हायरल होत आहे. या गाण्यावर जगभरातील लोकांनी डान्स केला यात काहीच विशेष नाहीये, हो असं लिहिण्याचं कारण म्हणजे आता या गाण्यावर चक्क कार देखील थिरकल्या आहेत. कदाचित हे तु्म्हाला पटणार नाही. पण या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहिल्यावर तुमचा नक्कीच या गोष्टीवर विश्वास बसेल यात शंका नाही. हो कारण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये, नाटू नाटू गाण्याच्या बीट्सवर संपूर्ण लाईट शो आयोजित केल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत; कंडक्टरची तिकीट काढण्यासाठी कसरत, Video पाहून पोट धरुन हसाल

हेही पाहा- स्टेशनवरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू झाला अन्…, रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांची शरमेने झुकली मान

शिवाय यासाठी टेस्ला कार वापरण्यात आल्या आहेत, या घटनेचा व्हिडीओ RRR चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला असून १ मिनिटाच्या या क्लिपमध्ये अनेक टेस्ला कार पार्किंगमध्ये रांगेत उभ्या असलेल्या दिसत आहे. तर गाड्यांच्या हेडलाइट्स नाटू नाटू गाण्याच्या ठेक्यावर एकसमान लुकलुकतांना दिसत आहेत. हा लाईट शो अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ न्यू जर्सी, यूएसए येथील आहे.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय ही भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, सातासमुद्रापार आपल्या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे, अशाही कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tesla cars put up a light show in sync to rrrs naatu naatu song amazing video goes viral jap
Show comments