भारतीय चित्रपटांमध्ये त्यातही खास करुन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अनेकदा गुंड हिरोवर गोळी झाडतो आणि ती गोळी कशाला तरी लागून पुन्हा गुंडालाच लागल्याचे सीन्स अनेकदा दाखवले जातात. अनेकदा हा सिन्स मस्करीचा विषय ठरतात. मात्र असा प्रकार खरोखर घडल्याचं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण खरंच नुकताच असा प्रकार घडलाय आणि त्यामध्ये गोळीबार करणारा आरोपीच मरण पावला.

नक्की वाचा >> चार काळी वर्तुळं असणाऱ्या ‘या’ ‘ट्रॅफिक साइन’चा अर्थ तुम्हाला माहितीय का? सोशल मीडियावरील चर्चेनंतर पोलिसांनीच दिलं उत्तर

अमेरिकेतील टेक्सास येथे ३० जुलै रोजी हा विचित्र प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेच्या मानेवर गोळीबार करण्याच्या नादात आपल्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीने आरोपी जखमी होऊन नंतर मृत्यूमुखी पडला. २६ वर्षीय बायरॉन रेडमॉन याने एका अनोळखी महिलेवर चालवलेली गोळी त्याच्याच पायाला लागली. टेक्सासमधील डाल्स जिल्ह्यातील २२०० मेडिकल ब्लॉक येथील एका खोलीमध्ये हा सारा प्रकार घडला. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा खोलीमध्ये कोणीच नव्हते. मात्र कोणीतरी खोलीमधून रस्त्याच्या दिशेला गेल्याचं रक्ताच्या डागांचा माग काढल्यानंतर पोलिसांना आढळून आलं. काही वेळातच पोलिसांना जवळच्या पार्कलॅण्ड मेमोरियल हॉस्पीटलमधून फोन आला. या फोन कॉलवर हा आरोपी आणि ती महिला एका कारमध्ये जखमी अवस्थेत आढळून आले. दोघांच्याही अंगावर गोळ्यांमुळे झालेल्या जखमांचे निशाण होते.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

डॉक्टरांनी २६ वर्षीय आरोपीला मृत घोषित केलं. या प्रकरणामधील महिलेबद्दलची माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही. हे दोघे एकमेकांना ओळखत होते की नाही याबद्दलची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. तसेच नेमक्या कोणत्या कारणावरुन हा गोळीबार करण्यात आला यासंदर्भातील माहिती पोलीस घेत आहेत. तरीही प्राथमिक तपासामध्ये या महिलेच्या गळ्याला ज्या गोळीने जखम झाली आणि जी गोळी मृत आरोपीच्या पायाला लागली ती एकच गोळी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या खोलीमध्ये नक्की काय घडल हे अद्याप अस्पष्ट असलं तरी आरोपीच्या मृत्यूमुळे प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

नक्की वाचा >> …अन् दुबईच्या राजकुमाराने Viral Video मधील त्या डिलेव्हरी बॉयला फोन करुन म्हटलं ‘Thank You’; जाणून घ्या काय घडलं

पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, “प्राथमिक तपासानुसार २६ वर्षीय बायरॉन रेडमॉनने एका महिलेवर रुममध्ये गोळीबार केला. त्याने तिच्या मानेवर गोळी चालवली. मात्र ही गोळी नंतर रेडमॉनच्याच पायाला लागली. रेडमॉनचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला,” असं म्हटलंय. मात्र हा सारा प्रकार पोलिसांनाही चक्रावणारा आहे.

नक्की पाहा >> धडक दिल्यानंतर ट्रकने जिल्हाध्यक्षाची कार ५०० मीटरपर्यंत फरफटत नेली; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद, पाहा Video

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला गोळी लागल्यानंतर तिची दिशा काही प्रमाणात बदलण्याची किंवा ती गोळी शरीरामध्ये अडकण्याची शक्यताच अधिक असते. मात्र कमी कॅलिबरची क्षमता असणाऱ्या शस्त्रांच्या बाबतीत गोळीने दिशा बदलण्याचा प्रकार घडू शकतो. म्हणजेच सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या ०.२२ कॅलिबरच्या हॅण्डगन, रायफल आणि इतर शस्त्रांच्या बाबतीत असं घडू शकतं. या शस्त्रांमधून निघालेली गोळी इतर अधिक क्षमतेच्या बंदुकींपेक्षा अधिक सहजपणे आपली दिशा बदलू शकते.