TSRTC Bus Viral Video : बसमधील भांडणाचे, मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ड्रायव्हरने बसस्थानकात बस न थांबवल्यामुळे एका संतापलेल्या मद्यधुंद अवस्थेतील महिला प्रवाश्याने चक्क बसवर दारूची बाटली फेकत बसची मागची काच फोडली, यानंतर तिने चक्क बॅगेतून साप काढून तो कंडक्टरच्या अंगावर फेकल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतरचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना हैदराबादमधील विद्यानगर परिसरातील आहे. यात एक वृद्ध मद्यधुंद महिला प्रवासी TGSRTC ची बस पडकण्यासाठी बसस्थानकावर थांबली होती. पण, ड्रायव्हरने हात दाखवूनही बस न थांबवल्याने मद्यधुंद महिला संतापली आणि तिने थेट बसवर मागून हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर बस ड्रायव्हरने बस थांबवली, ज्यानंतर कंडक्टर महिलेला पकडण्यासाठी म्हणून तिच्याजवळ पोहचली, पण यावेळी त्या महिला प्रवाश्याने कंडक्टरच्या अंगावर चक्क एक जिवंत साप सोडला. प्रवासी आणि महिला कंडक्टरने खाली उतरुन संबंधीत महिलेला पकडले, यावेळी तिने तिच्या बॅगेतून साप काढला आणि कंडक्टरच्या अंगावर फेकला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेचे वय ६० च्या जवळपास आहे, तिने हे संतापजनक कृत्य केले आहे. वृद्ध महिला प्रवाश्याने कंडक्टरच्या अंगावर सापाला फेकले पण साप तिच्या अंगावरून घसरला आणि खाली पडला आणि मिळेल त्या मार्गाने सरपटत निघून गेला, या घटनेमुळे बस स्थानकावर मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, प्रवाशांनी संबंधित महिला प्रवाश्याला पकडून ठेवत पोलिसांना माहिती दिली, अखेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला ताब्यात घेतले. More News On Trending : मुंबईकरांनो, तुम्हाला पालिकेकडून मिळणारे पिण्याचे किती शुद्ध असते? तपासणीनंतरचा निकाल पाहून बसेल धक्का यावर टीजीएसआरटीसीचे एमडी व्हीसी सज्जनार म्हणाले की, अशा घटना अत्यंत दुःखद आहेत, प्रवाशांनी कर्मचारी आणि मालमत्तेवर असे हल्ले टाळले पाहिजेत. अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नसून पोलिसांच्या मदतीने आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे सज्जनार यांनी सांगितले. याबाबत नल्लाकुंटा पोलिसांचे म्हणणे आहे की, दिलसुखनगरला जाणारी बस एनसीसी एक्स रोडजवळील विद्यानगर बस स्थानकावरून जात होती, तेव्हा महिलेने बसला थांबवण्यासाठी हात हलवला. वळण घेत असताना चालकाने बसचा वेग कमी केला. यादरम्यान महिलेने बसवर दारूची बाटली फेकली आणि बस थांबली. त्यानंतरच महिलेने बस कंडक्टरवर साप फेकला. या घटनेचा एक व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.