मलेशिया आणि दक्षिण थायलंडमधील मान्सून पावसामुळे विनाशकारी पूर स्थिती निर्माण झाली असून, हजारो लोक विस्थापित झाले आहेत आणि अनेकांचा जीव गेला आहे. थायलंडच्या आपत्ती प्रतिबंध व निवारण विभागानुसार, पूर-संबंधित घटनांमध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून ३ लाखांहून अधिक कुटुंबे गंभीरपणे प्रभावित झाली आहेत.

दरम्यान, बचाव आणि स्थलांतराच्या दुःखद दृश्यांमध्ये एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये पूराच्या पाण्यात महाकाय अजगर तरंगताना दिसतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे या अजगराने कुत्र्याला गिळले आहे.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

१ डिसेंबर रोजी पट्टानी प्रांतामध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला असून, त्यात महाकाय अजगर पोट फुगलेल्या अवस्थेत जलमय रस्त्यावर तरंगताना दिसतो. @AMAZINGNATURE या X (ट्विटर) हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दक्षिण थायलंडमध्ये पूराच्या पाण्यात हा महाकाय अजगर तरंगताना दिसला.”

व्हिडिओला सुमारे २० लाख लोकांनी पाहीले असून यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “थायलंड मा‍झ्या बकेट लिस्टमधून काढून टाकले.” दुसर्‍याने म्हटले, “हा अजगर पाण्यावर उलटा तरंगतोय, म्हणजे तो मृत असावा किंवा गंभीर त्रासात असावा.”

तिसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले, “त्याचं पोट मानवी आकाराचं दिसतंय, भीतीदायक आहे!”

यूसीए न्यूज या स्वतंत्र कॅथोलिक न्यूज स्रोतानुसार, पट्टानी, नराथिवात, सोंगख्ला, नखोन सी थम्मरात आणि फटलुंग या पाच दक्षिणेकडील प्रांतांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. ३३,००० हून अधिक लोकांना आपली घरे सोडावी लागली असून, थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

खनिज संसाधन विभागाने ५ डिसेंबरपर्यंत दक्षिण थायलंडमध्ये भूस्खलन आणि वेगाने येणाऱ्या पुराचा इशारा दिला असून, बचावकार्य सुरू आहे.

Story img Loader