Mahindra Thar OG Launched : महिंद्रा अँड महिंद्राने ‘महिंद्रा थार OG’ (Mahindra Thar OG) १०.३२ लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. ही नवीन महिंद्रा थार २०२० मध्ये आलेल्या ३-डोअर मॉडेलची जागा घेईल आणि ती AXT, LXT व नव्याने सादर करण्यात आलेल्या ZXT अशा ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे.
भारतात महिंद्रा थार OG ची किंमत १०.३२ लाख रुपयांपासून सुरु होईल ते १८.९९ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. या गाडीची डिलिव्हरी ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु होऊन ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत डिलिव्हरी सुरु राहील. गाड्यांसाठी वर सांगितलेल्या सुरुवातीच्या किमती लागू असतील.
महिंद्रा कंपनीने सांगितले की, थार ब्रँडने आतापर्यंत ४,००,००० युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. नवीन मॉडेलमध्ये आधीप्रमाणेच ३ दरवाजे असतील. मात्र, गाडीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात नवीन प्लॅटफॉर्म, सुधारलेले सस्पेंशन, अधिक पॉवरफुल पेट्रोल आणि डिझेल इंजिन, नवीन डिझाइन तसेच अधिक सुरक्षा आणि ऑफ-रोड फीचर्स देण्यात आले आहेत.
व्हेरियंट्स आणि किंमती
एंट्री-लेव्हल AXT व्हेरिएंट फक्त १.५ लिटर डिझेल इंजिन, रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. त्याची किंमत १०.३२ लाख रुपये आहे.
LXT व्हेरिएंटची १.५ लिटर डिझेल, RWD आणि मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या मॉडेलची किंमत १२.९९ लाख रुपये आहे.
२.२ लिटर डिझेल इंजिनसह RWD ऑटोमॅटिकची किंमत १६.४९ लाख रुपये, 4WD मॅन्युअलची १६.४३ लाख रुपये, तर 4WD ऑटोमॅटिकची १८ लाख रुपये आहे.
२.० लिटर पेट्रोल इंजिन असलेल्या LXT ची किंमत RWD ऑटोमॅटिकसाठी १४.७७ लाख रुपये, 4WD मॅन्युअलसाठी १५.६० लाख रुपये आणि 4WD ऑटोमॅटिकसाठी १७.२३ लाख रुपये आहे.
ZXT व्हेरिएंटची १.५ लिटर डिझेल, RWD आणि मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या मॉडेलची किंमत १३.९९ लाख रुपये आहे. २.२ लिटर डिझेलच्या RWD ऑटोमॅटिकची किंमत १७.४९ लाख रुपये आहे.
पेट्रोल ZXT ची किंमत RWD ऑटोमॅटिकसाठी १६.०९ लाख रुपये, 4WD मॅन्युअलसाठी १६.६० लाख रुपये आणि 4WD ऑटोमॅटिकसाठी १७.७५ लाख रुपये आहे.
नवीन प्लॅटफॉर्म आणि सस्पेन्शन
Thar OG ही नवीन M_Glyde 4G प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. महिंद्राच्या म्हणण्यानुसार, हा प्लॅटफॉर्म अधिक मजबूत आणि कडक आहे. गाडीच्या मागील बाजूस Watts Link सह Pentalink सस्पेन्शन देण्यात आले आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग आणि आवाज, कंपने व धक्के कमी करणारी सुधारित प्रणाली देण्यात आली आहे. गाडीचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी कंपनीने Frequency-Dependent Damping आणि ‘Davinci’ डॅम्पिंग तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. त्यामुळे खराब रस्त्यांवर गाडी चालवताना धक्के आणि कंपने कमी जाणवण्यास मदत होते.
इंजिनचे पर्याय आणि फीचर्स
Mahindra Thar OG च्या लाँचमुळे मोठ्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनची पॉवर आणि टॉर्क क्षमता वाढवण्यात आली आहे.
२.० लिटर G20 TGDi mStallion पेट्रोल इंजिन आता ११९kW पॉवर आणि ३३०Nm टॉर्क निर्माण करते. तर २.२-लिटर D22 mHawk डिझेल इंजिन १११.९kW पॉवर आणि ३३०Nm टॉर्क देते. १.५-लिटर D117 CRDe डिझेल इंजिनची क्षमता ८७.२kW पॉवर आणि ३००Nm टॉर्क इतकीच कायम आहे; त्याच्या आउटपुटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Mahindra Thar OG मध्ये, १.५ लिटर डिझेल इंजिनचा पर्याय केवळ RWD मॅन्युअल कॉन्फिगरेशनपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. २.२-लिटर डिझेल आणि २.०-लिटर पेट्रोल इंजिनसाठी RWD ऑटोमॅटिक, 4WD मॅन्युअल आणि 4WD ऑटोमॅटिक असे पर्याय उपलब्ध आहेत.

बाह्य स्वरूप, केबिन आणि रंग
डिझाइनमधील बदलांमध्ये नवीन ग्रिल, नवीन LED टेल-लॅम्प्स आणि रुंद ट्रॅकसह (wider track) नव्याने डिझाइन केलेले पुढील व मागील बंपर्स यांचा समावेश आहे.
ZXT व्हेरिएंटमध्ये ‘सिग्नेचर C-शेप्ड’ डेटाइम रनिंग लाइट्ससह गोलाकार LED हेडलॅम्प्स, ‘कॉर्नरिंग फंक्शन’ असलेले LED ‘आइस-क्यूब’ फॉग लॅम्प्स आणि १९-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. AXT व्हेरिएंटमध्ये १८-इंच स्टील व्हील्स मिळतात, तर LXT व्हेरिएंट १८-इंच अलॉय व्हील्ससह येतो.
आतील भागात, टॉप व्हेरिएंटमध्ये ‘ट्रफल ब्राउन’ (Truffle Brown) रंगाच्या एम्बॉस्ड लेदरेट सीट्स आणि लेदरेट-रॅप्ड स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे. LXT आणि ZXT मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह १०.२५ इंचाची एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. ZXT मध्ये अतिरिक्त वायरलेस फोन चार्जर देखील मिळतो.
महिंद्रा थारच्या मूळ रंगांमध्ये सहा शेड्ससोबतच आर्टेमिस सिल्व्हर आणि जीन्स ब्लू या दोन नवीन पर्यायांचा समावेश आहे.
ऑफ-रोड आणि सुरक्षा उपकरणे
मुख्य ऑफ-रोड फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक लॉकिंग डिफरेंशियल आणि चिखल, वाळू व बर्फासाठी टेरेन मोड्सचा समावेश आहे. हे दोन्ही केवळ LXT आणि ZXT च्या 4WD आवृत्त्यांमध्येच उपलब्ध आहेत.
२.२-लिटर डिझेल आणि २.०-लिटर पेट्रोल इंजिन असलेल्या RWD आवृत्त्यांमध्ये टेरेन असिस्ट मिळते.
AXT आणि LXT मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि रिअर ड्रम ब्रेक्स आहेत. ZXT मध्ये प्रथमच चार एअरबॅग्जची भर पडली आहे, ज्यामुळे एकूण संख्या सहा झाली आहे.
ZXT मध्ये चारही चाकांवर डिस्क ब्रेक्स, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि रिअर-व्ह्यू कॅमेरा देखील मिळतो. महिंद्राने थार ओजीमध्ये अतिरिक्तपणे ईएसपी ९.३ सुइट दिला आहे.
