Thar and Swift Car Accident Video : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे घडतात, ज्यात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो; तर कधी भीषण अपघातातूनही ते सुखरूप बचावले जातात. सध्या अशाच एका अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका थार चालकाच्या चुकीमुळे स्विफ्ट चालकाचा जीव धोक्यात आलेला दिसतेय. इथे एका सेकंदाचाही वेळ गेला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, पण स्विफ्ट चालकाच्या सावधगिरीमुळे दुर्घटना टळली.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून वाहनं सामान्य वेगाने जात आहेत. याचवेळी अचानक समोरून अतिशय वेगाने एक थार येते, जी पुढे जाऊन स्विफ्टला धडकलीच असती, पण स्विफ्ट चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळतो. थारचा वेग इतका प्रचंड होता की वाटले आता थार आणि स्विफ्ट एकमेकांशी टक्कर घेतील, पण पुढच्याच क्षणी स्विफ्ट चालक वेगाने आपल्या गाडीवर नियंत्रण मिळवतो आणि ती रस्त्याच्या बाजूला वळवतो, ज्यामुळे मोठा अपघात टळतो.
दरम्यान, थार पुढे वेगाने निघून जाते. संपूर्ण घटना इतक्या लवकर घडते की, पाहणारेही स्तब्ध होतात. स्विफ्ट चालकाच्या हजरजबाबीपणामुळे मोठा अपघात टळतो, म्हणूनच अनेक लोक स्विफ्ट चालकाचे कौतुक करत आहेत.
या भयंकर अपघाताचा व्हिडीओ @1abhisheknaks नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स विविध कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, काय टायमिंग आहे, खरोखरच कमाल कंट्रोल. तर दुसऱ्या युजरने विनोदी पद्धतीने लिहिले की, वाचला रे बाबा, अन्यथा तो आज वर पोहोचला असता. तिसऱ्या युजरने चालकाचे कौतुक करत लिहिले की, परफेक्ट स्किल आणि परफेक्ट टायमिंग, चालकाला खरोखरच सलाम. काही युजर्सनी अपघातासाठी थार चालकाला जबाबदार धरले. एका युजरने लिहिले की संपूर्ण चूक थार चालकाची आहे, अशा प्रकरणांमध्ये कठोर नियम बनवले पाहिजेत.
