सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात, त्यापैकी काही व्हायरल देखील होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल सांगणार आहोत, जो पाहून तुमचे डोळे पाणावतील. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक वृद्ध जोडपं स्नॅक्स विकताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० रुपयात देतात व्हिडीओ

हा व्हिडिओ फूड ब्लॉग व्हिडीओ आहे ज्यामध्ये हे वृद्ध जोडपे दाखवण्यात आले आहे. हे वृद्ध जोडपे तुम्हाला फक्त १० रुपयात स्वादिष्ट पोहे विकतात. या वृद्ध जोडप्याची मेहनत आणि प्रेम पाहून तुमचेही डोळे ओलावतील.जगण्यासाठी धावपळ करणाऱ्या जिंदगी से जंगच्या व्हिडीओतील वृद्ध जोडप्याला पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येणार नाही. सतत चेहऱ्यावर हास्य घेऊन लोकांना पोहे विकणारा हे वृद्ध ६८ वर्षांचे आहे. या वयात हे दाम्पत्य दोन वेळच्या भाकरीसाठी प्रामाणिकपणे लढत जीवन जगत आहे. या वृद्ध जोडप्याच्या या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे नेटीझन्सचं कौतुक करत आहेत.

( हे ही वाचा: दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन नवरदेव पोहोचला मुलीच्या घरी, पहिली बायको समोर उभी दिसली, मग.. )

सकाळी ६ वाजता सुरु करतात काम

व्हिडिओमध्ये दिसत आहे की या जोडप्याला एवढी गरिबी आहे की त्यांच्याकडे दुकानही नाही. नागपुरातील पंडित नेहरू कॉन्व्हेंट, तांडापेठसमोर हे वृद्ध जोडपे सकाळी ६ वाजता रस्त्याच्या कडेला जागा तयार करतात आणि तेथे विक्री करतात. सकाळपासूनच लोक त्यांच्याकडे यायला लागतात.

( हे ही वाचा: पाठवणीच्या वेळी ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ गाण्यावर नवरीने केला जोरदार डान्स; बघा Viral Video )

घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते

या वृद्ध जोडप्याच्या अवस्थेवरून तुम्ही अंदाज लावू शकता की, एक काळ असा होता की घराचे भाडेही भरता येत नव्हते. त्यामुळे या वयातही ते पोहे विकण्याचे काम करत आहेत. हे जोडपे एकमेकांना मदत करण्यात आयुष्य घालवत आहेत. त्यांना पाहून आजच्या पिढीने हे शिकायला हवे की, काळ कोणताही असो, एकमेकांची साथ कधीच सोडू नये.

( हे ही वाचा: क्रॉसिंगवर ट्रेन कारला धडकली पण महिला चालकाला ओरखडासुद्धा आला नाही! थरारक घटनेचे फोटो Viral )

( हे ही वाचा: महिलेला जेवणात आढळला असा पदार्थ की… VIDEO पाहून तुम्ही चक्रावून जाल! )

रोज ४ वाजता उठून बनवतात पदार्थ

वृद्ध जोडप्याने जी पोह्यांची डिश विकतात ती रोज ताजी बनवतात. त्यामुळे पोहे बनवण्यासाठी हे वृद्ध जोडपे रोज पहाटे ४ वाजता उठतात जेणेकरून त्यांना पोहे बनवण्याची सर्व तयारी करता येईल. अशा प्रकारे ज्येष्ठांच्या मेहनतीला नेटिझन्स सलाम करत आहेत. सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत. जेणेकरून नागपूरच्या कानाकोपऱ्यातील लोक त्यांना मदत करू शकतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The 68 year old couple was forced to work due to circumstances and netizens became emotional after seeing the honesty and hard work ttg
First published on: 09-12-2021 at 18:35 IST