America Met Gala 2022: सर्वात मोठी फॅशन नाईट म्हणून प्रसिद्ध असलेला मेट गाला सुरू झाला आहे. यावर्षी न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला २०२२ ची थीम ‘इन अमेरिका: अॅन अँथॉलॉजी ऑफ फॅशन’ आहे. व्हेनेसा फ्रीडमन, रेजिना किंग, ब्लेक लाइव्हली, रायन रेनॉल्ड्स, लिन-मॅन्युएल मिरांडा हे मेट गाला २०२२ होस्ट करणार आहेत. त्याच्यासोबत टॉम फोर्ड, अॅडम मोसेरी आणि अॅना विंटूर हे सामील होतील. दरवर्षी मेट गालामध्ये काही खास फॅशन डिझाईन्स पाहायला मिळतात. परंतु यंदाच्या या फॅशन इव्हेंटमधील ड्रेस थीमपेक्षा या कार्यक्रमासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चला जाणून घेऊया मेट गालाचे नियम जे कार्यक्रमात आवश्यक आहेत.
वयाचे बंधन
यावेळी व्हेनेसा फ्रेडमन, रेजिना किंग, ब्लेक लाइव्हली, रायन रेनॉल्ड्स, लिन-मॅन्युएल मिरांडा ‘मेट गाला २०२२’ होस्ट करत आहेत. यामध्ये हॉलिवूडपासून ते जगभरातील चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘मेट गाला’ इव्हेंटमधील नियमांबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वप्रथम वयोमर्यादेबाबत लागू केलेले नियम समोर येतात. १८ वर्षांखालील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत. १८ वर्षांखालील तरुणांसाठी हा कार्यक्रम योग्य नसल्याचे सांगण्यात येतंय.




खूपच आकर्षक असतात ‘या’ राशीची मुलं; पहिल्या भेटीतच लोकं होतात प्रभावित
धूम्रपान आणि सेल्फी बॅन
याशिवाय इव्हेंटमध्ये सेल्फी फोटो काढण्यावर बंदी आहे. २०१५ मध्ये कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याची बातमीही समोर आली होती. मात्र, प्रत्येक वेळी नियमांचे पालन करण्यात चूक होत आहे. २०१७ मध्ये, काइली जेनने बाथरूममध्ये स्वत:चा सेल्फी घेतला, त्यानंतर हा नियम अधिक कडक करण्यात आला. सेल्फी व्यतिरिक्त, इव्हेंटमध्ये धूम्रपान करण्यास देखील बंदी आहे, २०१७ मध्ये बेला हदीद आणि डकोटा जॉन्सन यांना वॉशरूममध्ये धूम्रपान करताना पकडले गेले होते. यानंतर बोर्ड सदस्यांनीही हे प्रकरण कठोरपणे घेतले होते.
कांदा-लसूणच्या सेवनावर बंदी
खाद्यप्रेमींसाठी, हा नियम नक्कीच थोडा विचित्र वाटेल की कार्यक्रमात कांदा आणि लसूण खाण्यास देखील मनाई आहे. मेट गालामध्ये कॉकटेल आणि औपचारिक डिनरचे आयोजन केले जाते, परंतु तेथे आलेल्या पाहुण्यांना जेवणात कांदा आणि लसूण दिले जात नाही. लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून असे करण्यात आल्याचे समजते.
अनेक मोठे लोक या कार्यक्रमात येतात जे त्यांचे वर्चस्व दर्शविण्याचा प्रयत्न करतात. कोणाचाही अपमान होऊ नये यासाठी आयोजकांनी आसन व्यवस्थेबाबतही नियम केले आहेत. भारतात मेट गाला २०२२ सोमवार-मंगळवार पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पाहता येईल.