सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाला अपडेटेड राहायचं असतं आणि स्वतःबद्दलच्या सर्व गोष्टी इतरांसोबत सतत शेअर करायच्या असतात. काहीजणांसाठी तर ही गोष्ट त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील एक भागच झाली आहे. हल्ली इन्फ्लुएन्सर बनण्याचं ट्रेंड आहे आणि त्यासाठीच प्रत्येकजण धडपडतोय. सध्या तर लहान लहान मुलांचे व्हिडीओही तुफान व्हायरल होतात. त्यांचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट्स पण असतात. त्यांचे पालक हे अकाउंट्स सांभाळतात.

याचा अर्थ असा होतो की पालक सतत कॅमेरा घेऊन मुलांच्या मागे धावत असतात. परंतु या वेळेस मात्र पालकांच्या या कृतीमुळे चिडलेल्या एका लहान मुलाने आपल्या वडिलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मोलिक जैन असं या मुलाचं नाव असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. मोलिकचे इन्स्टाग्रामवर १७ हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. या व्हिडीओमध्ये जेव्हा मोलिकचे वडील त्याचा व्हिडीओ शूट करतात तेव्हा तो ‘आजच्या मुलांच्या समस्या’ यावरून त्यांचा समाचार घेतो. यावेळी तो कारमध्ये बसून उसाचा रस पिताना दिसत आहे.

सोशल मीडिया स्टार किली पॉलवर अज्ञातांनी चाकूने केला हल्ला; इंस्टाग्रामवरून दिली घटनेची माहिती

उन्हाळ्यात लोकांना मोफत थंड पाणी मिळावं म्हणून पठ्ठयाने केलं असं काही; सोशल मीडियावर होतंय कौतुक

त्याचे वडील म्हणतात, “हॅलो मोलिक…” आणि मग त्याची बडबड सुरू होते. चिडलेला मोलिक आपल्या वडिलांना म्हणतो, “तुमचं काय चाललंय सारखं सारखं? मी जेव्हाही काही खात असेन, पीत असेन, तुम्ही लगेच कॅमेरा घेऊन तिथे हजर होता. मी टॉयलेटला गेलेलो असतानाही तुम्ही कॅमेरा घेऊन आलात. मला काही करूच देत नाहीत तुम्ही.”

इतकंच नाही तर आजकाल प्रत्येक मुलासोबत हे कसे घडते याचा उल्लेखही त्याने केला. तो म्हणाला. “हे माझ्यासोबतच नाही तर आजकाल प्रत्येक लहान मुलासोबत घडत आहे. प्रत्येक पालकांना हेच वाटतंय की त्यांच्या मुलाने इन्फ्लुएन्सर बनावं. संपूर्ण आयुष्य मी या कॅमेरामध्येच घुसून राहू का?”

तेव्हा वडिलांनी मोलिकला विचारले की तू खरंच ऊस पीत आहेस का? मोलिक हो म्हणतो आणि वडिलांना व्हिडीओ रेकॉर्डिंग थांबवण्याची विनंती करतो. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली असून ते या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.