scorecardresearch

इंद्रधनुष्यासाठी विमानातून पाऊस पाडत नवविवाहित जोडप्याने केले अनोखे फोटोशूट!

ब्रिटनच्या प्रिस्किला आणि अॅलिसन या नवविवाहित जोडप्याने केले अनोखे फोटो शूट, विमानाद्वारे त्यांच्यावर ९०० लीटर पाण्याच्या करण्यात आला फवारा

इंद्रधनुष्यासाठी विमानातून पाऊस पाडत नवविवाहित जोडप्याने केले अनोखे फोटोशूट!
ब्रिटनच्या एका नवविवाहित जोडप्याने फोटोग्राफी साठी चक्क विमानातून इंद्रधनुष्य सारखा वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर ९०० लीटर पाण्याचा फवारा करण्यात आलाय.

प्री-वेडिंग फोटोशूट’ हा ट्रेंड आपल्यापैकी प्रत्येकाला अगदी ओळखीचा झालाच आहे. हल्ली मुळातच लग्नात फोटोशूट हा एक अत्यंत मोठा आणि इंटरेस्टिंग भाग बनला आहे. फेसबुक-इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक रोमँटिक अल्बम आपण पाहतच असतो. कधी या फोटोशूटमध्ये नवरीवर फुलांचा वर्षांव होतो, तर कधी तिच्या साडीचा पदर हिंदी सिनेमाच्या नटीसारखा लांब हवेत उडतो. म्हणूनच लग्नाआधी किंवा लग्नानंतर अशा फोटोशूट्सचे हटके अल्बम करण्याची इच्छा अनेक जोडपी व्यक्त करतात.

प्रि-वेडिंग आणि पोस्ट वेडिंग फोटोशूटसाठी अनेकजण वेगवेगळी सुंदर ठिकाणं निवडतात. पण ब्रिटनच्या एका नवविवाहित जोडप्याने आपल्या फोटोशूटसाठी इंद्रधनुष्य निर्माण करण्यासाठी चक्क विमानातून ९०० लीटर पाण्याचा फवारा मारला आहे. प्रिस्किला आणि अॅलिसन अशी या नववधू-वराचं नावं असून एका अत्यंत क्रिएटिव्ह प्रयोगाने आपला हा फोटोशूट खूप खास केला आहे.

‘द सन’मधील एका रिपोर्टनुसार, जेव्हा या जोडप्याचं फोटोशूट सुरू करण्यात आलं तेव्हा दोघांनीही पोझ देण्यास सुरुवात केली. यानंतर एका विमानाद्वारे या दोघांवरही थंड पाणी ओतण्यात आलं. दरम्यान यामुळे तिथं इंद्रधनुष्य दिसलं आणि फोटोग्राफरने त्या जोडप्यांचे फोटो काढून हा चांगला क्षण कॅमेर्‍यात कैद केला. हे अनोखे फोटो वेलिटन बार्बोसा यांनी काढले आहेत. तर त्यांनी प्रत्येक नवीन शूट काहींना काही शिकवतच असतं असं सांगितलं. काही नवं करण्याची संधी खूप समाधान देणारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, ब्रिटनमधील जोडप्याचं हे अनोखं फोटोशूट प्रचंड चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 15:15 IST

संबंधित बातम्या