वधू-वरानी रस्त्यावर केलं भन्नाट नृत्य, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू येईल

वधू-वराचा हा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का? व्हिडीओ मधल्या नवरीचा डान्स पाहून तुम्ही सुद्धा तुमच्या हसण्यावर कंट्रोल करू शकणार नाही.

trending
वधू -वरांनी रस्त्याच्या मधोमध एक भन्नाट नृत्य केले.

आजकाल लग्नात वधू-वर डान्स करण्याचा एक अद्भुत ट्रेंड सध्या सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक वधू-वर यांना वाटत की आपलं लग्न खूप स्मरणीय व्हावे. अशातच तुम्हाला सोशल मीडियावर असे अनेक भन्नाट व्हिडीओ पाहायला मिळतील. ज्यात वधू-वर एकत्र गाण्यावर ठेका धरतांना दिसतात. असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून तुमचं हसू देखील कंट्रोल होणार नाही. कारण या व्हिडीओमध्ये नवरीची एंट्रीचं खूप कमालीची आहे. नवरी एंट्री करताचं आश्चर्यकारक डान्स स्टेप करत नाचू लागते. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर गाजत असलेला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर अतिशय छान पद्धतीने नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एकीकडे पाहिले तर जिथे वर मोठ्या आनंदाने नाचत आहे. तेथूनच वधू एंट्री करते, आणि अशी काही नाचते की ते पाहून पूर्ण वर्‍हाडी मंडळी हसायला लागतात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्स भन्नाट कमेंट करत आहेत.

या व्हिडीओला पाहून एका युजर्सने कमेंट केली की, वर आणि वधू दोघेही कलाकार आहेत. तर दुसर्‍या युजर्सने म्हटले की, वरातीत नाचण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते, की ती दोघे नाचताय? या वधू -वराच्या डान्सचा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच गाजत असून या व्हिडिओने आतापर्यंत हजारो व्ह्यूज गोळा केले आहेत. तर खूप सारे लाईक्स मिळवले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The bride and groom started dancing on the middle of the road scsm