…अन् लग्नाचा लेहेंगा घालूनचं वधू पोहचली परीक्षा केंद्रावर; व्हिडीओ व्हायरल

लग्नामुळे अनेक मुलींनी आपले शिक्षण सोडतात, मात्र याचदरम्यान एक मुलगी लग्नाच्याच दिवशी परीक्षा देण्यास आल्याने सगळेच चक्रावून गेले.

bride in lehenga gives exam
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @viralbhayani / Instagram )

एक काळ असा होता की लग्नाचा दिवस हा मुलींसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस होता. पण काळाबरोबर महिलांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले आणि गुजरातमधील ही वधू याचच सुंदर उदाहरण मांडताना दिसते. तुम्ही सर्वांनी अनेकदा पाहिले असेल की मुली त्यांच्या लग्नाच्या दिवशी खूप व्यस्त असतात. कधी खरेदीत तर कधी घरच्या कामात, पण आता जे समोर आले आहे ते खूपच आदर्श दाखवणारं आहे. खरं तर, राजकोटची शिवांगी बगथरिया पाचव्या व्या सेमिस्टरची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि यामुळे तिने अनेकांची मने जिंकली.

अलीकडे लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. लग्नामुळे अनेक मुलींनी आपले शिक्षण सोडले, मात्र याचदरम्यान शिवांगी बगथरिया नावाची मुलगी लग्नाचे कपडे घालून परीक्षा हॉलमध्ये आली तेव्हा सगळेच चक्रावून गेले. ‘माझ्यासाठी लग्नापेक्षा शिक्षण महत्त्वाचे आहे,’ असे तिने माध्यमांशी बोलताना सांगितले. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल भयानी यांच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, शिवांगी एक हेव्ही लेहेंगा, वधूचे दागिने आणि मेकअपमध्ये परीक्षेला बसताना दिसत आहे. परीक्षा हॉलमध्ये उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत ती पूर्ण एकाग्रतेने पेपर लिहिताना दिसते.

( हे ही वाचा: Viral Video: ट्रेनमध्ये मिळाली नाही जागा म्हणून जुगाड करत चक्क बनवली स्वतःची सीट! )

हा व्हिडीओ आतापर्यंत ४८७ हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिडीओवर अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत. या व्हिडीओबाबत नेटिझन्सची वेगवेगळी मते आहेत. काहींनी शिवांगीच्या भावनेचे कौतुक केले तर काहींनी व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवांगीने एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, जेव्हा तिच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती, त्यावेळी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. पण तिला परीक्षा देता यावी म्हणून आम्ही लग्नाचा मुहूर्त थोडा उशीर केला.

( हे ही वाचा: किंग कोब्राला कधी ग्लासमध्ये पाणी पिताना पाहिलयं का? व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क )

नेटीझन्सची प्रतिक्रिया

या व्हिडीओवर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘परीक्षेनंतरही मेकअप करता आला असता, हा एक दिखाऊपणा आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘परीक्षा हॉलमध्ये हा व्हिडीओ कोण बनवत आहे’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘परीक्षा हॉलमध्ये कॅमेरा’ कसा? या व्हिडीओवर लोक आणखी मजेशीर कमेंट करत आहेत, तसेच अनेक इमोजीही पाहायला मिळत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The bride arrives at the examination center wearing a wedding lehenga video goes viral ttg

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या