scorecardresearch

नवरी आहे की रबरबॅंड! वरमाला घालताना नवऱ्याच्या नाकी नऊ आले, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहलं आहे, ‘नवरी योगा करणं जेव्हा मनावर घेते.’

नवरी आहे की रबरबॅंड! वरमाला घालताना नवऱ्याच्या नाकी नऊ आले, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
एका लग्न समारंभातील लवचिक वधूचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर सध्या अनेक वेगवेगळे मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये कधी लहान मुलांनी तर कधी त्यांच्या शिक्षिकांनी केलेले डान्स असतात. तर कधी नवरा-नवरीने लग्नात घेतलेल्या भन्नाट उखाण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. याशिवाय कधी धक्कादायक, आकर्षक तर कधी काळजाला भिडणारे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात.

हेही पाहा- भन्नाट! ‘बेशरम रंग’ गाण्यात तरुणीने भरला नवा रंग, बोल्ड डान्सचा video तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, ” हिच्यापुढं दीपिका फेल”

सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे लग्न समारंभातील व्हिडीओंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अनेक वधु-वर आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं कसं ठरेल यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हीदेखील या लवचिक वधूच्या प्रेमात पडाल. कारण लग्न समारंभात वधु आणि वर एकमेकांना वरमाला घालत असताना या वधूने असं काही केलं आहे ते पाहून तुम्ही थक्क व्हाल यात शंकाच नाही.

हेही पाहा- Video: भर लग्नमंडपात नवरीसोबत नवऱ्याने केलं असं काही….; नवरी चक्क स्टेजवरच पडली, नेमकं काय घडलं?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत वधु-वर लग्न समारंभात स्टेजवर एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. यावेळी नवरी पहिल्यांदा नवऱ्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालते. त्यानंतर नवरा ज्यावेळी नवरीच्या गळ्यात वरमाला घालायला जातो त्यावेळी नवरी कंबरेत वाकवताना दिसत आहे. शिवाय ती मागच्या बाजूला इतकी वाकते की जवळपास १८० डिग्रीपर्यंत ती मागे गेल्याचे पाहायला मिळतं आहे. त्यामुळे ही नवरी इतक्या सहजपणे आपलं शरीर कसं वाकवू शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. तर अनेकांनी या नवरीच्या लवचिक शरीराचे कौतुक केलं आहे.

शिवाय नवऱ्याने वरमाला गळ्यात घातल्यानंतर ती पुन्हा सहजपणे सरळ उभी झाल्याचंही पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ prachitomar2207 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १.७ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर १.४ मिलियन लोकांनी तो लाईक केला आहे. त्यामुळे तो नेटकऱ्यांना या नवरीचा व्हिडीओ किती भावला आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 18:21 IST

संबंधित बातम्या