सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होताना दिसून येतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो खूपच क्यूट आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा सुद्धा दिवस आनंदाने भरून निघेल. होय, तुमच्य आई-वडिलांच्या लग्नात तू पण होतास असं अनेकदा आपल्या लहानपणी आई वडील गमतीने म्हणाले असतील. पण ते आपलं लहानपण असायचं. पण प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नसायचं. पण आज आम्ही एक अशा नशीबवान मुलाबद्दल सांगत आहोत ज्याने आपल्या आई वडिलांच्या लग्नातच हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटासा मुलगा नववधूच्या वेशभूषेत सजलेल्या आपल्या आईकडे धावताना दिसून येतो. ही नववधू अगदी सजून धजून गॅलरीमधून पाहूण्यांच्या दिशेने येताना दिसून येतेय. नेमकं त्याच वेळी तिचा मुलगा देखील तिच्या दिशेने धावत येत असताना तिने पाहिले. हा क्यूट व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. आपल्या आईच्या लग्नात जे रिंग बिअरर होतं ते आपल्या मुलाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. हे दृश्य फारच मनमोहक आहेत.

सुंदर स्ट्रेपलेस पांढऱ्या रंगाच्या नववधूच्या वेशभूषेत सजलेली ही आई जेव्हा तिच्या मुलाला पाहते त्यावेळी ती भावूक होते. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रु देखील तरंगताना दिसून येतात. नवरीच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण खूपच भावूक करणारा आहे. यावेळी नवरी तिच्या मुलाला हात पकडून पुढे येऊ लागते. त्यानंतर पुढचे दृश्य आणखी भावूक करणारे आहे. ज्यावेळी नवरी तिच्या मुलाला हात पकडून पुढे येते, त्याचवेळी मुलाचे वडील सुद्धा त्याचा हात पकडून त्यांच्यासोबत चालू लागतात.

आणखी वाचा : पाठवणीच्या वेळी नवरीऐवजी नवरदेवच ढसाढसा रडला, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : उष्णतेच्या लाटेवर बिहारी टीचरने गायलेलं हे गाणं एकदा ऐकाच!

हा व्हिडीओ goodnewscorrespondent नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भावूक होत लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव सुरू केलाय. काहींनी इमोजीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमधल्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून लोक त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The brides son suddenly came in front of the wedding then what happened watch video prp
First published on: 04-05-2022 at 14:16 IST