scorecardresearch

जंगलाचा राजा सिंहाची म्हशींनी केली दयनीय अवस्था! बघा Viral Video

जंगलाच्या राज्याला एका म्हैशीने तर शिंगांवर घेत फेकून देताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

buffalo lion fighting
व्हायरल व्हिडीओ (फोटो: animals_videos01 / Instgarm)

जंगलाचा राजा, सिंह हा असा प्राणी आहे की त्याच्याशी लढण्याचे धाडस करत नाही. सिंहाला पाहून मोठमोठे प्राणीही जीव वाचवण्यासाठी धावताना दिसतात. मात्र, सर्वांनी एकत्र आल्यास जंगलाच्या राजालाही पराभूत केले जाऊ शकते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने हे सिद्ध केले आहे. जेव्हा सिंह शिकार करण्याच्या उद्देशाने आला तेव्हा तेव्हा म्हशींनी मिळून अशा प्रकारे हल्ला केला की, सिंहाची अवस्था वाईट झाली. एका म्हशीने सिंहाला शिंगावरून फेकून मारले. म्हशींनी सिंहाला अशा प्रकारे मारहाण केली की या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.

सिंहाने म्हशीवर हल्ला केल्याचे पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या इतर रानटी म्हशी एकत्र येतात. इथे म्हशींची एकता सिंहावर जड होते आणि याउलट सिंहाची धुलाई सुरू होते. म्हैस तर सिंहाला शिंगांनी मारताना दिसते. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

व्हायरल होत असलेला व्हिडीओ २०१९ चा असला तरी तो पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच एकताच्या शक्तीचे उदाहरण द्याल. खरंच, एकात्मतेत इतकी ताकद असते की समोरची मोठी शक्तीही कमी पडते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, पहिला सिंह फक्त एका जंगली म्हशीला भिडतो ज्यावर सिंह दबाव आणण्याचा प्रयत्न करतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The buffalo made a miserable condition of the lion king of the forest watch viral video ttg

ताज्या बातम्या