आपल्या देशात नागरिकांना नियम समजावण्यासाठी ठिकठिकाणी नियमावली, वेगवेगळे फलक लावावे लागतात. तसेच आपल्या देशात टॉयलेटला घेऊन योग्य व्यवहार शिकवण्यासाठी टॉयलेटच्या आतमध्येही सूचनाफलक लावले जातात. कोणाला टॉयलेटच्या हाफ आणि फुल फ्लशबाबतचे नियम माहित नसतात, तर कोणी फ्लश केल्याशिवाय टॉयलेटमधून बाहेर येतात. असं तर फ्लश हायजिनसाठी उपयुक्त आहेच परंतु हा आपल्याला पैसे देखील मिळवून देऊ शकतो. इटलीमध्ये एका जोडप्याने फ्लशच्या मदतीने ८ लाख रुपये रुपये मिळवले आहेत.

गल्फ पफ पोएट्स (Gulf Of Poets) मध्ये राहणाऱ्या पतिपत्नीने शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या फ्लशच्या आवाजावरून कोर्टात धाव घेतली. या केसला जवळपास २० वर्ष लोटल्यानंतर कोर्टाने या जोडप्याला त्यांच्या शेजाऱ्यांकडून £८००० म्हणजेच भारतीय चालनानुसार ८ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून देऊ केली आहे. शेजाऱ्यांच्या फ्लशच्या आवाजामुळे रात्रभर झोपता येत नाही असा आरोप या जोडप्याने केला होता. हे प्रकरण त्यांनी कोर्टात खेचले.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; मानसिक तणावासोबतच होईल आर्थिक नुकसान

२००३ साली केली होती तक्रार

इटालियन कोस्टल शहरात राहणाऱ्या या जोडप्याने २००३ साली याचिका सादर केली होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ४ भावांच्या घरातून फ्लशचा मोठा आवाज येतो, असे त्यांनी या याचिकेत म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या बेडरूमला लागून असलेल्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूने हा आवाज यायचा, जिथे शेजाऱ्यांचा फ्लश होता, असे या जोडप्याने कोर्टात सांगितले. त्यांचा बेडरूम खूपच लहान असल्याने आणि ते बेडचे स्थान बदलू शकत नसल्यामुळे, या आवाजामुळे त्यांची झोप उडायची. ही बाब गांभीर्याने घेत न्यायालयाने दोन्ही सदनिकांची तपासणीही करून घेतली.

स्वतःच्या सेल्फी विकून विद्यार्थ्याने कमावले ७ कोटी रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

२० वर्षांनंतर लागला निकाल

घरांची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांना त्यांची लाऊड ​​फ्लश यंत्रणा बदलण्यास सांगितले. शेजारीही अतिशय आडमुठे होते, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. येथे दिलेला निर्णय आधीच्या निर्णयापेक्षा वाईट होता. फ्लशच्या आवाजाने जोडप्याच्या झोपेचा त्रास होतो, त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांना ८ लाख ११ हजार रुपयांहून अधिक नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले. कल्पना करा की हे जोडपे कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुमारे २० वर्षे चकरा मारत होते, त्यानंतर त्यांना शांत झोपण्याचा अधिकार मिळाला.