फिरायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण आपल्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून काही दिवस कुठे तरी फिरायला जातो. परंतु सतत फिरत राहणे कोणालाही शक्य नाही आणि हे परवडण्यासारखेही नाही. मात्र असे एक जोडपे आहे ज्याने फिरण्यासाठी आपली नोकरी देखील सोडली आहे. इतकंच नाही तर क्रूझ जहाजांवर पूर्णवेळ राहण्यासाठी त्यांनी आपलं राहतं घरही विकून टाकले. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी जमिनीवर घर ठेवण्यापेक्षा असे करण्यात अधिक आर्थिक फायदा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिएटल, यूएसमधील या जोडप्याने आपली नोकरी सोडली आणि क्रूझ जहाजांवर पूर्णवेळ राहण्यासाठी त्यांचे राहते घर विकले आहे. अँजेलिन आणि रिचर्ड बुर्क या जोडप्याला समुद्रपर्यटन फार आवडते. यासाठी त्यांच्या लग्नादरम्यान त्यांनी वर्षातून किमान एकदा क्रूझने प्रवास करण्याचे वचनही एकमेकांना दिले होते. पण गेल्यावर्षी या जोडप्याच्या मनात काही वेगळेच विचार येऊ लागले. त्यांनी सेवानिवृत्तीबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात करून पूर्णवेळ क्रूझ जहाजांवर राहण्याच्या खर्चाची मोजणी ते करू लागले.

‘या’ महिलेने एकाचवेळी दिला पाच मुलांना जन्म; हॉस्पिटलमधील कर्मचारीही झाले थक्क

अँजेलिनने केलेल्या मोजणीनुसार, जर त्यांनी लॉयल्टी मेंबरशिप वापरली आणि विक्रीच्या कालावधीत ती खरेदी केली, त्याची किंमत दिवसाला ४२ डॉलर म्हणजेच ३२५० रुपये इतकी कमी असेल. “आम्ही खरोखरच समुद्रपर्यटनाचा आनंद घेतो आणि विमानात न बसता जगाच्या विविध भागांना भेट देऊ शकतो,” असे अँजेलिनने न्यूज वेबसाइट 7लाइफला सांगितले. १९९२ मध्ये कॅरिबियनमध्ये जाण्यासाठी अँजेलिन पहिल्यांदा मेगा-शिपमध्ये बसली आणि तेव्हापासूनच तिला समुद्रप्रवास आवडू लागला.

सुरुवातीला त्यांची मूळ योजना एका वेळी एका महिन्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये राहण्याची होती. मात्र कालांतराने त्यांनी क्रूझ जहाजांवर निवृत्त व्हायचे ठरवले. त्यांना प्रवास करायला आवडते आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते सतत प्रवास करण्याच्या मार्गाच्या शोधात होते, जे आर्थिकदृष्ट्याही सोयीस्कर असेल. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केल्यानंतर तिच्या असे लक्षात आले की ते लॉयल्टी मेंबरशिपचा वापर करून आणि विक्रीचा फायदा घेऊन, तसेच काहीही गहाण न ठेवता पूर्णवेळ समुद्रात राहून अधिक परवडणारे जीवन जगू शकतात.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी आयुष्यभर काटकसर करत आलो आहोत. आम्हाला भौतिक गोष्टींमध्ये नाही तर वेगवेगळे अनुभव घेण्यामध्ये रस असल्याचे तिने सांगितले. त्यांनी आधीच ५१ दिवस सिएटल ते सिडनी प्रवास केला आहे, युरोपभोवती फेरफटका मारला आहे आणि एड्रियाटिक समुद्राचा शोध घेतला आहे. या आनंदी जोडप्याच्या आवडत्या ठिकाणांमध्ये इटली, आइसलँड, कॅनडा, सिंगापूर आणि बहामास यांचा समावेश आहे.

एका व्यक्तीच्या पूर्ण दिवसाचा, राहणे, खाणे आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचा सरासरी खर्च ४२ डॉलर आहे. ‘मला विश्वास आहे की हे दररोजच्या क्रूझरसाठी साध्य करता येण्यासारखे आहे. परंतु यासाठी कष्टही करावे लागतील. बजेटमध्ये राहून, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि वाहतुकीच्या बुकिंगच्या गुंतागुंतीशिवाय आरामात प्रवास करणे आहे, हे आमच्या योजनेचा भाग आहे, असे ती पुढे म्हणाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The couple sold the house and moved on a cruise ship to stay forever you will be surprised to read the reason pvp
First published on: 14-05-2022 at 12:23 IST