Viral Video : पेट्रोल पंपावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात काही पेट्रोल पंपावरील अपघाताचे व्हिडिओ समोर येतात तर कधी पेट्रोल पंपावरील भांडणं चर्चेत येतात. अनेकदा पेट्रोल पंपावर आग लागल्याचे अनेक प्रकरणे सुद्धा समोर आलेली आहेत. सध्या एका पेट्रोल पंपावरील व्हिडिओ वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये एक चारचाकी चालक गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येतो. पेट्रोल भरतो पण त्याचे पैसे तेथील कर्मचाऱ्याला देत नाही आणि पैसे न देता पेट्रोल पंपावरून पळण्याचा प्रयत्न करतो पण पुढे कर्मचारी असं काही करतो की तुम्हीही अवाक् व्हाल. नेमके काय घडते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.
हा व्हायरल व्हिडिओ एका पेट्रोल पंपावरील आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चार चाकी पांढऱ्या रंगाची गाडी दिसेल. पेट्रोल भरल्यानंतर कर्मचारी पैसे घेण्यासाठी गाडी जवळ उभा राहतो पण गाडी चालक पैसे न देता तिथून पळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कर्मचारी असे काही करतो की दोन मिनिटांसाठी कोणीही शॉक होईल. कर्मचाऱ्याला जेव्हा लक्षात येते की कार चालक पैसे न देता पळून जात आहे. तेव्हा कर्मचारी गाडीमागे पळत गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा गाडी त्याच्या हातून निसटते तेव्हा तो गाडीच्या मागील काचेवर एक जोराने हाताने बुक्का मारतो व काच फुटते. हा व्हिडिओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओवर लिहिलेले आहे, ठपाचशे रुपयांचे पेट्रोल आणि तीन हजारांचा काच”
हेही वाचा : पाण्यासाठी एकमेकींना चक्क हंड्यांनी मारलं अन्… नळावरील भांडणाचा ‘हा’ मजेशीर Video पाहून पोट धरुन हसाल
या व्हिडिओतून तुमच्या लक्षात येईल की कार चालकाला पेट्रोलचे पाचशे रुपये न देणे चांगलेच महागात पडले. कर्मचाऱ्यांनी चक्क त्याच्या गाडीची ३००० रुपयांची काच फोडली.
पाहा व्हायरल व्हिडिओ
https://www.instagram.com/reel/DAi0CanN9ls/?igsh=MTd3Nzdyb3ZhOWEycw%3D%3D
first..editor..07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडिओ पाहून मजा आली” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगलं काम केलं भाऊ .” आणखी एका युजरने लिहिलेय, “५०० रुपयांच्या बदल्यात तीन हजार रुपयांचे नुकसान करून बसला कारचालक” एक युजर लिहितो, “याला म्हणतात हाताची पावर” तर दुसरा युजर लिहितो. “चांगली अद्दल घडवली. अशा लोकांबरोबर असेच व्हायला पाहिजे.”