बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये ऐन लग्न समारंभात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीतामढी जिल्ह्यात घडली आहे. या नवरदेवाच्या मृत्यूला कारण ठरला आहे डीजेचा आवाज. डिजेच्या मोठ्या आवाजामुळे नवऱ्या मुलाला अस्वस्थ वाटू लागले आणि नंतर तो बेशुद्ध पडला, उपस्थितांनी त्याला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वधू-वरांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटना घडली त्या ठिकाणी डीजेला बंदी होती तरीही मोठ्या आवाजात डीजे वाजवला गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री इंदरवा गावात राहणाऱ्या एका मुलीचा विवाह धनहा पंचायतीच्या मनीथर वार्ड क्रमांक ९ येथील सुरेंद्र याच्याबरोबर होणार होता. यावेळी घरासमोर वरात आली, वधू-वर स्टेजवर गेले, समोर सर्व वऱ्हाड उपस्थित होते आणि लग्न समारंभात मोठ्या आवाजात डीजे वर गाणी सुरु होती. स्टेजवर वधूने नवरदेवाला ओवाळलं आणि दोघांनी एकमेकांना वरमाळा घातली. त्यानंतर फोटो सेशन सुरू झाले. बराच वेळ फोटो सेशन चालले होते. यावेळी मोठ्या आवाजात डीजेही वाजत होता.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही पाहा- Video: वहिनीच्या प्रेमात पडला, गावकऱ्यांसमोर द्यावी लागली ‘अग्निपरीक्षा’; निखाऱ्यात हात घातला अन्…

आवाजाने नवरदेव अस्वस्थ –

डिजेच्या मोठ्या आवाजाचा नवरदेवाला त्रास होत होता. शिवाय तो डिजे बंद करण्याची वारंवार मागणी करत होता. यावेळी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणितो बेशुद्ध पडला. लोकांनी नवरदेवाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो शुद्धीत न आल्याने त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.

हेही पाहा- जाळ्यात तडफडणाऱ्या कावळ्याला चिमुकल्याने दिलं जीवदान, Viral Video पाहून तुम्हीही भारावून जाल

वाटेतच झाला मृत्यू –

रुग्णालयात नेले तेव्हा सुरेंद्र बेशुद्ध अवस्थेत होता. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सीतामढी येथे हालवण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सुरेंद्रचा मृत्यू झाला. सुरेंद्रच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबासह संपुर्ण गावात शोककळा पसरली आहे.